educational psychology 6

psychology
६.अध्यापन प्रक्रिया
१.अध्यापन प्रक्रिया :
डिक्सनरी ऑफ एज्युकेशन : औपचारिक रित्या शाळेत येणाऱ्या व अनौपचरिक रित्या उपक्रमात सहभागी असणाऱ्या प्रसंग परिस्थिती उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यापन प्रकिया.
२.अध्यापन एक कला आहे व शिक्षक मोठा कलावान आहे:
१.अध्यापन एक कला आहे शिक्षक मोठा कलावान आहे.
२.अध्यापन म्हणजे अध्ययन करण्यास प्रवृत्त करणे.
३.विद्यार्थांचे अध्ययन घडवून येण्यासाठी अध्ययनासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करणे.
४.विद्यार्थांत वर्तन परिवर्तन घडवून आणण्यासाठी जे काही नियोजन करावे लागते,प्रोत्साहन द्यावे लागते ,पध्दती वापरावी लागते तो सर्व खटाटोप म्हणजे अध्यापन होय.

३.अध्यापन सौदर्य व वर्ग नियंत्रणासाठी त्याचा उपयोग :
१.शिक्षकांनी हसत मुद्रेने वर्गात प्रवेश करणे.
२.शिक्षकांनी विद्यार्थांना कळेल त्या भाषात शिकवणे.
३.शिक्षकांनी विद्यार्थांना कविता चालीवर म्हणून दाखवणे.
४.शिक्षकांने विद्यार्थांना नाट्य शिकवतांना स्वरात चढ उतार चेहऱ्यावर हावभाव व पत्रानुसार भाषण करावे.
५.शिक्षकांने स्पष्टीकरण करतांना चित्राचा वापर करणे.
६.शिक्षकांने विद्यार्थांना जास्तीत जास्त प्रशोत्तर पद्धतीने शिकवणे यालाच अध्यापन सौदर्य म्हणतात.
७.अनुभव विश्वाला धरून केलेले अध्यापन सौदर्य होय.

४.परिणामकारक अध्यापन
परिणामकारक अध्यापन म्हणजे अचूक अध्यापन पद्धती ,शैक्षणिक साधने ,अनुभव याचे सूत्र बुध्द गुंपण करून केलेले अध्यापन म्हणजे परिणाकारक अध्यापन .
१.विद्यार्थाचे क्षमता.
२.विद्यार्थाचे पूर्वज्ञान .
३.विद्यार्थाची गरज व आवड.
४.अध्यापनाची उद्दिष्टे.
५.विषयाचे स्वरूप .
६.अध्यापन साहित्य.

५.सचेतन अध्यापन :
शिक्षक हा घटक सजीव आहे व दुसरा घटक विद्यार्थी हा सजीव आहे.
म्हणून सजीवाचा –साजीवाशी येणाऱ्या संबंधाला सचेतन अध्यापन म्हणतात.शिक्षकांने सचेतन अध्यापन होण्यासाठी प्रयत्न शील राहावे.

६.पूर्वप्राथमिक स्तरावरील अध्यापन पद्धती :
१. ३ ते ६ वयोगटातील मुलांना दिले जाणारे अनौपचारिक शिक्षण म्हणजे पूर्वप्राथमिक शिक्षण होय.
२.पूर्व प्राथमिक शिक्षणाची कल्पना अनुताई वाघ याने काढली .त्यांचा जन्म १९१० कोसबाड येथे झाला.
३.पूर्व प्राथमिक स्तरावर मुलांना शिक्षण देतांना संश्लेषण पध्दती वापरावी म्हणजे अक्षर ,शब्द ,व्याक्य असे शिकवावे.
४.बलाद्योन पध्दती जनक फ्रोबेल आहे.आवड,अनुभव विश्व ,आकलन क्षमता,बौद्धिक स्तरानुसार विविध छंद व क्रिडा प्रवृत्ती करण्यास प्रोत्साहन देणे म्हणजे बलाद्योन होय.

७.प्रोढासाठी अध्यापन पद्धती :
१.निरक्षर लोकांना साक्षर बनविण्यासाठी दिले जाणारे शिक्षण म्हणजे प्रौढ शिक्षण होय.
२.प्रौढसाठी अध्यापन करतांना विश्लेषण पध्दती वापरावी वाक्य,शब्द,अक्षर यांची ओळख करू देणे.
३.प्रौढांना वाचन ,लेखन ,अंकज्ञान व्यवहार पुरते,शिकवणे.
४.प्रौढशिक्षणाची उद्दिष्टे कार्यकुशलता जाणीव जागृती ,साक्षरता होय.
८.अध्यापन सूत्रे किंवा अध्ययन प्रक्रियेचे शैक्षणिक सिद्धांत :
१.सोप्या कडून काठीणाकडे: सुगामाकडून दुर्गामाकडे शिकविणे विद्यार्थाचे वय,आवडी ,निवडी,अनुभव विश्व,आकलन क्षमता बौद्धिक स्तर याला झेपल तेच मुलांना शिकवणे.
उदा-एकदम बेरीज ,वजाबाकी न शिकविता प्रथम अंकज्ञान शिकवणे.
२.ज्ञाताकडून अज्ञाताकडे: विद्यार्थांना माहित असलेल्या गोष्टीकडून माहित नसणाऱ्या गोष्टीकडे नेणे.
उदा-जिल्हा परिषदेचे कार्य शिकवतांना प्रथम ग्रामपंचायत ,तहसील व नंतर जिल्हापरिषद चे कार्य शिकवणे.
३.मुर्ताकडून अमुर्ताकडे: विद्यार्थांच्या प्रत्यक्ष अनुभवातून नंतर त्यांना अप्रत्यक्ष अनुभव देणे.
उदा-विद्यार्थांना पोस्टकार्ड माहिती आहेत यावरून पोस्टाचे व्यवहार शिकवणे.
४.साध्याकडून सामिश्राकडे : प्रथम मुळाक्षरे काना,मात्रा,विलांटी ओळख करून देणे नंतर जोडाक्षर शिकवणे.
५.मानसशास्त्रीय दृष्टीकोनाकडून तर्कशास्त्र दृष्टीकोनाकडे : विद्यार्थांना तर्कशास्त्र दृष्टीकोन निर्माण करतांना ताप आल्यास डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवता ? या अनुभवाची शास्त्रीय मीमांसा करावी.
६.पूर्णा कडून अंशाकडे: विद्यार्थांना संपूर्ण फुल दाखवून नंतर त्या फुलांची रचना कशी आहे हे शिकवणे.
७.विशेषांकडून सामन्याकडे: उदागामी पध्दतीने विद्यार्थांना व्याकरण शिकवावे.
८.सामान्यकडून विशेषाकडे : अवगामी पध्दतीने विद्यार्थांना व्याकरण शिकवावे.
९.पृथक्करणांकडून संयोजानाकडे: भाग सुटे करणे उदा-भूमितीचे प्रमेय शिकवणे.
१०. संयोजानाकडून पृथक्करणांकडे: यात क्रिया विना वाच्यार्थ व्यर्थ आहे .विद्यार्थांना भाषा विषयांच्या म्हणी,वाक्यप्रचार शिकवणे.
११.प्रत्याक्षाकडून प्रतीनिधीत्वाकडे : विद्यार्थांना चित्र दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव देणे.
१२.निसर्गांच्या मार्गांने चला: विद्यार्थांच्या आवडी निवडी ,अनुभव विश्व ,आकलन क्षमता ,बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी निसर्गाच्या अनेक गोष्टीचे अनुकरण करायला लावणे.

९.व्यक्तीमहत्व व शिक्षकांच्या व्यक्तिमहत्वातील आवश्यक गुण :
व्यक्तीमहत्व :मानसिक जीवन व मनाच्या क्रिया प्रतिक्रिया यांचा संघटीत समूह म्हणजे व्यक्तीमहत्व होय.
१.शारीरिक गुण : निरोगी ,चेहरा प्रसन्न .
२.बौद्धिक पात्रता: विषय तत्वे,मुल्ये ,सजावून देणे.
३.मानसिक योग्यता: आपलेपणा,प्रेम,सुरक्षितता.
४.सामाजिक बांधिलकी :समाजाशी मिळून मिसळून राहण्याची पात्रता.
५.चरित्र: शीलवान व चारीत्रावन असावा.
६.व्यावसायिक कौशल्य: आपल्या व्यवसायातील सर्व अध्यापन कौशल्य त्यांच्या जवळ असावे.

 

१०.शिक्षकांच्या व्यक्तिमहत्वाचा विद्यार्थांच्या व्यक्तिमहत्वावर होणारा परिणाम:
१.शिक्षक निरोगी व प्रसन्न चेहऱ्याचा असेल तर तो विद्यार्थांना योग्य अध्यापन करेल.
२.शिक्षकात विषय,तत्वे,मूल्य समजावून देण्याची पात्रता असेल तर तो विद्यार्थांना अध्ययन विषयात आवड निर्माण करेल.
३.शिक्षकांजवळ अपलेपणा ,प्रेम,सुरक्षितता,स्विकार,स्वतंत्र व्यक्तीमहत्वचा सन्मान मनोरंजन ,मित्रसहवास,असेल तर तो विद्यार्थांचे मानसिक स्वास्थ चांगले ठेवेल.
४.शिक्षक समाजाशी मिळून मिसळून राहत असेल तर विद्यार्थी त्यांचे अनुकरण करून समाज प्रिय वर्तन करतील.
५.शिक्षक शीलवान ,चारीत्रावन असेल,तर तो मुलांना चांगले अनुभव देईल.
६.शिक्षकाजवळ आपल्या व्यवसायातील सर्व कौशल्य असतील तर तो विद्यार्थांसाठी परिणाकारक अध्यापन करून अध्यापन सचेतन बनवेल.
११.गुरु सान्निध्य ही संकल्पना :
गुरु ब्रम्हा ,गुरोर्विष्णू ,गुरुदेवो महेश्वरा!
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरुवेनम:
एका हदयातील विचार दुसऱ्या हदयात पेरणे म्हणजे गुरु सान्निध्य होय.

मुख्य पृष्ठ