educational psychology

Educational psychology
घटक1 :: घटक2 :: घटक3 :: घटक4 :: घटक5 :: घटक 6 :: घटक7 ::
१.बालमानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती

१.मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र .
१.मानवी वर्तनाचे शास्त्र –विल्सबरी.
२.वर्तनाचे अध्यन –जे.बी .वाटसन
३.व्यवहारवादी प्रमेय-वूडवर्थ
४.आत्माचे शास्त्र-प्लोटो
५.मनाचे शास्त्र –ऑरीस्टल
६.बोधावस्थेचे शास्त्र -विल्यम वूंट १९७९ साली प्रयोग केला.
७.अबोधावस्थेचे शास्त्र –विल्यम वूंट
८.सजीव प्राण्याच्या वागणुकीचे येथार्थ स्वरूप शोधून काढून मनाची मीमांसा करारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
९.मनुष्याच्या स्थूल –सूक्ष्म ,मूर्त –अमूर्त अशा
सर्वच प्रकारच्या आंतर –बाह्य वर्तनाचा ,स्वभावाचा ,अनुभवाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे.

२.बालकांचे वर्तन .
१.मानवी मनाचे प्रतिबिंब त्याच्या वागणुकीत दिसते.
२.मुलाचे काही दुखू लागले की ते रडते.आपण त्याच्यासोबत
गोड बोललो किंवा ते खेळू लागलो की ते हसते.
३.बालकांच्या वर्तनात त्याच्या मनाचे प्रतिबिंब पडलेले असते.
४.वर्तन हे बाह्य दृश्य असते असे नाही,भावना कल्पना ,विचार ,मनाची स्थिती असे अदृश घटक सुद्धा त्यात असू शकतात.

३.मानसशास्त्र विविध शाखा.
१.सामान्य मानसशास्त्र .
२.मनोविकृती मानसशास्त्र .
३ .बाल मानसशास्त्र .
४.युवक मानसशास्त्र .
५.प्राण्याचे मानसशास्त्र .
६.शैक्षणिक मानसशास्त्र .
७.ओद्योगिक मानसशास्त्र .
८.मानसं आरोग्य शास्त्र.
१०.शारीरिक मानसशास्त्र .
११.प्रायोगिक मानसशास्त्र .
१२.प्रोढाचे मानसशास्त्र व कला चे मानसशास्त्र.
शिक्षणाचा विचार करून आपल्या विषयापुरता अभ्यास करण्यासाठी
शैक्षणिक व बाल मानसशास्त्र माहिती असणे आवश्यक आहे.

४.शैक्षणिक मानसशास्त्र :
शिक्षण :- १.व्यक्तीचे प्राप्त परिस्थीशी समायोजन.
२.व्यक्तीच्या विकासाला वळण लावणे.
३.व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे.
शैक्षणिक मानसशास्त्र:
१.स्कीनर –मानवी प्राण्याच्या शैक्षणिक वातावरणातील अभ्यास .
२.जडड –शिकणाऱ्याच्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय.
३.क्रो व क्रो –व्यक्तीच्या जन्मपूर्व अवस्थापासून वृद्धा अवस्थे पर्यंत अभ्यास म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र .
४.गृथी व पॉवर्स –जे शास्त्र मानेता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वाचा उपयोग शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी करते ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय.

५.मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र यांचा परस्पर संबंध :
१.शरीर आणि मन याचा जेवढा संबंध आहे तेवढा.
२.मानसशास्त्र मनुष्याच्या वागणुकीचे शास्त्र आहे.तर शैक्षणिक मानसशास्त्र वागणुकीला वळण लावणारे शास्त्र आहे.
३.मानसशास्त्र हे वास्तवादी शास्त्र आहे. तर शैक्षणिक मानसशास्त्र आदर्शवादी शास्त्र आहे.
४.शैक्षणिक मानसशास्त्र अध्यन करणारी व्यक्ती ,तिचे व्यक्तिमत्व ,तिच्या विकासाच्या अवस्था,तिची अध्यन –अध्यापन प्रकिया त्याचे महत्व,त्याच्या विकासाच्या अपेक्षा त्यात निर्माण होणाऱ्या समस्या ह्या सर्वांचा अभ्यास ज्या शास्त्रात वैज्ञानिक पद्धतीने केला जातो त्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात.
वरील सर्व अभ्यास मानसशास्त्र सुद्धा येतो ,म्हणूनच मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र यांचा जवळचा संबंध आहे.

६.बाल मानसशास्त्र व त्याचे विषय :
बाल मानसशास्त्र : जन्मपूर्व अवस्थेपासून किशोरावस्थेपर्यंत होणाऱ्या विविध विकासाचा अभ्यास बालमानसशास्त्र करते.
विषय:
१.बालकाच्या विकासाचे टप्पे कळतात.
२.बालकांच्या विकासाचे अंगे कळतात.
३.बालकांच्या गरजा व समस्या कळतात.
४.बालकांचे मानसिक स्वास्थ कळते.
५.बालकांची अध्यन प्रक्रिया कळते.
६.बालकाला अध्यानास प्रवृत्त करणारी अध्यापन प्रक्रिया कळते.
७.बालकांतील व्यक्तिभेद कळतात.

७.बालमानसशास्त्राची गरज व महत्व :
१.पूर्वीच्या काळी फक्त बालकाच्या शारीरक विकासाला महत्व दिले जात होते.
२.५० वर्षात मानसशास्त्राचे संशोधन आणि संशोधना अंती हे दाखवून दिले की बालक म्हणजे प्रोढ माणसाची लघु आवृत्ती नव्हे.
३.बालकाचे शारीरिक विकासाबरोबर दहा प्रकारे विकास होतात.
४.शिक्षकांनी बाल मानसशास्त्राचे विषय अभ्यासावे.

८.शिक्षकाला बाल मानसशास्त्राच्या अध्यानाची आवश्यकता :
शिक्षकाने बाल मानसशास्त्राचे विषय कृपया अभ्यासावे त्याशिवाय सर्वांगीण
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमातून शैक्षणिक प्रगतीला हातभार लागणे
फारच कठीण आहे.

९.वर्तन अभ्यासाच्या विविध पद्धती :
१.निरीक्षण पद्धाती : निरीक्षण म्हणजे बारकाईने पाहणी करणे ,नुसते पाहणे वेगळे व बारकाईने पाहणे वेगळे आहे.
निरिक्षणाचे प्रकार :
१.आत्म निरीक्षण : स्वताचे स्वत: केलेले निरीक्षण आत्मनिरीक्षण होय.
मर्यादा:
१.आपण स्वत;निरीक्षण तटस्थपणे करू शकत नाही.
२.केवळ योगी,संत ,मनावर ताबा असणारे करू शकतात.
३.आपणच अनुभवणे व आपणच निरीक्षण करणे हे एका व्यक्तीकडून होणे कठीण आहे.
४.मन स्थूल नसून सूक्ष्म आहे शिवाय मनाच्या अवस्था क्षणाक्षणा बदलतात.
५.वेडसर,मंदबुद्धी ,प्रौढकी मारणारे लोक हे निरीक्षण करू शकत नाहीत .
६.स्वत:चे निरीक्षण म्हणजे आत्म निरीक्षण व दुसऱ्याचे निरीक्षण करणे म्हणजे बाह्य निरीक्षण होय.
२.बाह्य निरीक्षण : आई –वडिल व इतर ही सर्व लोक बालकांचे निरीक्षण करतात त्यांना बाह्य निरीक्षण म्हणतात.
मर्यादा:
१.आपले मुल माकड असले तरी ते मदन वाटते म्हणून निरीक्षणामध्ये नि:पक्षपाती पणा नसतो.
२.एखादे निरीक्षण योग्य प्रकारे झाले नाही तर तसे वर्तन घडण्याची वाट पाहावी लागते.
३.वर्तनाला परिस्थितीच्या वातावरणातून वेगळे करणे कठीण आहे.

३.नियंत्रित किंवा प्रायोगिक निरीक्षण :
१.नियमित वातावरणातील प्रयोग म्हणजे प्रायोगिक निरीक्षण होय .
२.प्राप्त परिस्थीतीशी संपूर्ण नियंत्रण ठेवून त्यातील घटकात योग्य बदल करून
त्याच्या परिणामांचे प्रयोजकाने केलेले निरीक्षण म्हणजे प्रायोगिक निरीक्षण होय.
३.या निरीक्षणात दोन व्यक्तीची गरज आहे,एक प्रयोज्य ,दुसरा प्रायोजक .
४.हे प्रयोग फक्त जीवंत प्राणी मात्रावर केले जातात.

मर्यादा:
१.सगळेच घटक नियंत्रित करणे कठीण आहे.
२.मनुष्य प्रयोगाच्या वेळी मनातील भावना लपवितो म्हणून निष्कर्ष चुकीचे निघतात.
३.प्रयोग हे फक्त प्रयोग शाळेतच करता येतात म्हणून कृत्रिम परिस्थित घडणाऱ्या प्रतिक्रिया ह्या नैसर्गिक असतात असे नाही.
४.प्रयोज्याचे सहकार्य मिळत नाही.
५.प्रयोग शाळेत गुंतागुतीची परिस्थिती निर्माण करणे कठीण असते.
समस्येवर प्रयोग करता येत नाहीत.

निरीक्षण पद्धतीचे वैशिष्टे :
१.ही सोपी अभ्यास पद्धती आहे.
२.अंतर निरीक्षणासाठी कोणतीही साधन सामुग्री आणि बाह्य निरीक्षणासाठी थोडी असली तरी पुरी आहे.
३.निरीक्षणामुळे खरी माहिती मिळते व ती बऱ्याच प्रमाणात वस्तुनिष्ठ असते.
४.नियंत्रीत निरीक्षणासाठी प्रयोगशाळेत स्थैर्यमापन ,छाया यंत्र ,निरीक्षण घुमट,इत्यादी साधनाचा उपयोग करावा लागतो.

निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा:
१.अ –निरीक्षण :- डॉक्टर ला एखाद्या रोगाचे निदान झाले नाही तर त्यावर औषध उपचार योग्य होणार नाही .
२.अप –निरीक्षण : -जेव्हा ज्ञानेंद्रीये व्यवस्थित काम करत नाहीत तेव्हा आहे त्यापेक्षा वेगळी स्थिती दिसते त्यास अप-निरीक्षण म्हणतात.

२.सर्वेक्षण पद्धती :
बालकाची सर्व बाजूंनी केलेली पाहणी म्हणजे सर्वेक्षण होय.
वैशिष्टे :
१.सर्वेक्षणामुळे वस्तुस्थितीचे ज्ञान मिळते.
२.विशेष गरजा,समस्या,याचे ज्ञान होते.
३.वस्तुस्थीचे विश्लेषण करता येते.
४.बालकल्याण उपक्रमासाठी सर्वेषण उपयुक्त होय.
५.सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत असते.

मर्यादा :
१.शास्त्रज्ञांना आवडीची पद्धती पण कठीण आहे.
२.गटाने अभ्यास करतांना तसा गटवार अभ्यास करता येत नाही .
३.पालकाचे व इतर व्यक्तीचे सहकार्य मिळत नाही .
४.सर्वेक्षण करतांना वेळ खूप वाया जातो.

३.प्रायोगिक पद्धती :
प्रायोगिक पद्धती म्हणजे नियंत्रित निरीक्षण पद्धती होय.

४.जीवन वृत्तांत पद्धती :
बालकाच्या जीवनाचा वृत्तांत गोळा करून त्याद्वारे त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्याच्या पद्धतीला जीवन वृत्तांत पद्धती म्हणतात.
वैशिष्टे :
१.प्रश्न रूप बालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही पद्धती उपयुक्त आहे.
२.मुल कसे वागते हे निरीक्षकांना कळते.
३.त्याचे जीवन सुखकर करता येते.
४.बालकांचा कुटुंब व वयैक्तिक माहिती घेता येते.

मर्यादा:
१.बालाकासंबंधी इतर लोक योग्य माहिती देत नाही .
२.प्रश्नावली करणे सोपे नाही.
३.साक्षर लोकासाठी ही पद्धती उपयुक्त पण निरीक्षर लोकांसाठी कठीण आहे.
४.प्रश्नावलीतील प्रश्न न वाचता अंदाजे खुणा करण्याची शक्यता असते.

५.प्रक्षेपण पद्धती (रोशार्क चाचणी )
मनुष्यांच्या भावना,इच्छा ,मूल्य,हे त्याच्या कृतीतून व्यक्त होत असतात.
इतर वस्तूवर ही तो आपल्या भावना लादत असतो त्यालाच प्रक्षेपण म्हणतात.

वैशिष्टे :
१.वाक्यापुर्ती :मी शाळेतून घरी गेल्यावर............
२.गोष्ट पूर्ण करा.-एक मुलगा होता तो हुशार आहे .........
३.बाहुल्या खेळ:-भातुकलीच्या खेळातून आई –वडिलांच्या भावना ........
४.चित्र काढणे :-रोशार्क कसोटी २० चित्रे असतात.
५.दैनंदिनी :- मुलांना रोज लिहिण्यास सांगणे ....................

मर्यादा :
१.या पद्धतीचा उपयोग जाणकारच करतात कारण निष्कर्ष काढतांना खबरदारी घ्यावी लागते.
२.मुल अज्ञानाने ,संशयाने खरे किंवा खोटे बोलते त्यामुळे निरीक्षण अंदाज चुकतो.
३.समस्या प्रधान बालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही पद्धती उपयुक्त आहे.
४.बालकांच्या वर्तनाना योग्य अर्थ लावणे हे तज्ञाचे काम आहे .

६.समाजामिती पद्धती :
मोरेंनी १९४२ समाजामिती तंत्र हे नाव दिले .
जेकीन्स १९४७ नामनिर्देशन तंत्र हे नाव ठेवले.
वैशिष्टे :
१.बालकांच्या सामाजिक संबंधांना अनुसरून केलेले मापन म्हणजे समाजामिती होय.
२.व्यक्ती च्या वर्तनाचा अभ्यास म्हणजे समाजमिती होय .
३.जो नेता सर्वांना आवडतो त्याला स्टार समजावे .
४.जो कोणालाही आवडत नाही तो एकाकी समजावे .
५.समाजमिती आलेखानुसार मुलाचे संबंध पाहता येतात.
६.आदर्श विद्यार्थांची निवड करण्यासाठी उपयुक्त पद्धती आहे.

मर्यादा :
१.या साधनाची रचना करणे कठीण आहे.
२.आलेखात दिसणारे गट नेहमीच सारखे राहत नाहीत.
३.विद्यार्थांने दिलेली माहिती गुप्त न राहिल्यास त्यांचे माने कलुषित होतात.
४.विद्यार्थीना हे तंत्र माहिती झाल्यास विद्यार्थी खोटी माहित देतात.

२.वाढ व विकास

१.वाढ व विकास याची व्याख्या :
१.वाढ :-सतत चालणारी प्रगती होय.
२.विकास :- परीक्वतेच्या दिशेने परिवर्तन .
३.वाढ व विकास :- ही बालकाच्या परिवर्तनाची दोन रूपे आहेत.

२.वाढ व विकास यातील फरक :
१.वाढ हे मुलामध्ये होणारे इष्ट ते परिमाणात्मक बदल म्हणजे वाढ होय. व विकास म्हणजे मुलामध्ये होणारे इष्ट ते परिमाणात्मक व गुणात्मक बदल म्हणजे विकास होय.
२.वाढचे क्षेत्र मर्यादीत आहे. व विकासाचे क्षेत्र व्यापक आहे.
३.वाढ ही परिमाणात्मक असल्यामुळे आपण तिचे मापन सहज करू शकतो. उदा-उंची,वजन व विकास हा परिमाणात्मक बरोबर गुणात्मक आहे फक्त गुणात्मक विकासाचे मापन करू शकत नाही .उदा-भाषा विकास ,भावनिक विकास .
३.वाढ ही अनुवांशिकतेवर अवलंबून असते व विकास मात्र अनुवंशिकते बरोबर बाह्य परिस्थीतीवर अवलंबून असतो.

 

३.विकासाचे तत्वे (एलिझाबेथ हरलोक )
१.विकास हा सातत्याने होतो.
२.विकासाचा क्रम असतो. उदा-रांगणे,बसणे,उभेराहणे ,चालणे,उड्यामारणे ,
३.विकासाची गती सामान्याकडून विशिष्टाकडे असते. उदा-प्रथम शरीर हलविणे,नंतर डोके व हातपाय हलविणे
४.विकास एकदम होत नाही. उदा-एकदम दात येत नाही,किंवा वजन वाढत नाही.
५.विकासाचे स्वरूप बालपणी स्थिर होते व विकासात व्यक्तीभेद स्पष्ट दिसतात.
६ .विकासाचा वेग प्रत्येक भागासाठी वेगळा असतो. उदा –हात पायाची वाढ ही बाल्यवस्था मध्ये होत नाही तर किशोर वस्था मध्ये होते.
७.विकासाचे गुणधर्म एकमेकांशी संबंधित असतात.उदा-हुशार मुले सर्व क्षेत्रात प्रगती करतात पण मंदबुद्धीचे मुले आपली प्रगती करून घेत नाहीत.
८.मुलांच्या विकासासंबंधी भविष्य वर्तविता येते.
९.प्रत्येक विकास अवस्थेची काही वैशिष्टे असतात.उदा –गर्भावस्थेत विकास वेगाने होतो तर कुमारावस्था मध्ये लैंगिक विकास होतो.
१०.प्रत्येक व्यक्तीला या विकास अवस्थेतून जावे लागते.

४.विकासात होणारे बदल :
१.आकारात बदल :-उदा-वजन,उंची.
२.प्रमाणात बदल:- उदा-शरीर मध्ये प्रमाण बद्धता येते.
३.काही लक्षणे लुप्त होणे:- उदा-दुध दात पडणे ,बोबडे बोलणे संपते.
४.नवीन लक्षणे संपादन होणे:- नवीन दात येणे ,स्पष्ट भाषा बोलणे.

५.विकासाचे करणे :
१.परिपक्वता :- शरीराच्या अवयवात व गुणात नैसर्गिक रित्या परिपूर्णता येणे म्हणजे परिपक्वता होय.
२.अध्यन : परिपक्वतेशिवाय अध्यन होत नाही.

 

६.बालकांच्या विकासाचे टप्पे (अवस्था )
१.जन्मपूर्व अवस्था : बिजफालना पासून ते जन्म होईपर्यंत
१.जंतू अवस्था:-बीज फलन ते १३ ते १४ दिवस .
२.भुर्णा अवस्था :-२ आठवडे ते ३ आठवडे .
३.गर्भावस्था:३ आठवडे ते बालकांचा जन्म होईपर्यंत .
गर्भावस्थेत बालकांचा विकास वेगाने होतो.
२.अभर्कवस्था :बालकांच्या जन्मापासून ते १० ते १४ दिवस.
१.सद्योजातवस्था:- बालकांच्या जन्मापासून ते नाळकापेपर्यंत.
२.नवजातवस्था :-नाळकापेपासून ते १० ते १४ दिवस .
बालकांचे समायोजन :-
१.तापमान :-आईच्या उदरात १०० फ असते .आता ६० ते ७० फ
२.श्वसन:-पूर्वी नाळेद्वारे आता स्वताचे नाकांने करते.
३.मलोत्सर्जन:- पूर्वी नाळेद्वारे आता स्वत:च्या अवयाने .
३.शैशवावस्था :-२ आठवडे ते २ वर्ष यात बालकांच्या हाडांची वाढ होते.
४.बाल्यवस्था:-२ वर्ष ते ६ वर्ष यात पूर्व प्राथमिक शाळेत जाणारी बालक असतात.
५.किशोरावस्था:- ६ वर्ष ते १२ वर्ष यात विकास मंद गतीने होतो.व किशोरवस्था हा टोळ्याचा काळ मानल्या जातो.
६.कौमार्यावस्था:-१२ वर्ष ते १४ वर्ष यात मुलांना गटागटाने काम करणे आवडते .व भिनलिंगा बदल आकर्षण असते.या अवस्थेमध्ये मुलांचा लैंगिक विकास होतो.
७.पौंगडावस्था:-१४ वर्ष ते १८ वर्ष .
८.युवावस्था:-१८ वर्ष ते ३५ वर्ष .
९.प्रौढावस्था:-३५ वर्ष ते ६५ वर्ष .
१०.वृद्धावस्था:-६५ वर्ष ते मरेपर्यंत .
या सर्व अवस्थेमध्ये बालकांचा सर्वांगीण विकास होत असतो.

७.सर्वांगीण विकास .
बालकांच्या दहा अंगाचा विकास होणे म्हणजे सर्वांगीण विकास होय.
१.शारीरिक विकास.
२.गतिविकास.
३.संवेदनात्मक विकास.
४.संबोध विकास .
५.भावनिक विकास.
६.भाषिक विकास.
७.सामाजिक विकास.
८.बौद्धिक विकास.
९.सर्जनात्म विकास .
१०.सौदर्यात्मक विकास.

 

८.सर्जनशीलता व सर्जनशीलतेचे मानसशास्त्रीय घटक:
सर्जनशीलता:-काही तरी नवीन निर्माण करण्याची क्षमता म्हणजे सर्जनशीलता होय.
सर्जनशीलतेचे मानसशास्त्रीय घटक:
१.प्रवाहित्व :-कल्पना,विचार,योजना,अखंड ओघ असणे .
२.मौलिकता:-कल्पना,विचार,योजना,यात नवीनता आणणे.
३.लवचिकता :-कल्पना ,विचार ,योजना,सुचने .
४.विस्तार:अपूर्णता पूर्ण करणे .
५.पुनर्व्याख्या :-जुन्या व्याख्याची नवीन व्याख्या करणे.
६.समस्याविषयी संवेदनशीलता:गुण-दोष शोधणे.

९.सर्जनशीलता निर्माण करण्याचे शैक्षणिक महत्व :
१.विद्यार्थांच्या चित्रकला,शिल्पकला,संगीत,गायन स्पर्धा घेणे.
२.विद्यार्थांना विविध प्रश्न विचारणे.
३.विद्यार्थांना प्रोत्साहन देणे.
४.विद्यार्थात जिज्ञासा जागृत करणे.

१०.बालकांची सर्जनशीलता दिसून येणारी कृती:
१.काठीचा घोडा बनविणे.
२.बाहुलीला जीवंत समजून तिच्या सोबत खेळणे व बोलणे.
३.आगकाडी चे घरे,मातीचे किल्ले,कागदी होडी तयार करणे.
४.पुस्तकातील चित्राची नक्कल करणे.

११.सर्जानशीलतेवर परिणाम करणारे घटक:
१.लोकशाही पद्धतीचा अवलंब करणे.
२.विद्यार्थांना निर्णय घेण्याचे स्वतंत्र देणे.
३.विद्यार्थांच्या इच्छेप्रमाणे काम करण्याची संधी देणे.
४.विद्यार्थांना चांगल्या गोष्टी बदल प्रोत्साहन देणे.
५.विद्यार्थांची चांगल्या गोष्टीत जिज्ञासा वाढवणे.
६.विद्यार्थात योग्य सामाजिक अंतराक्रिया घडवून आणणे.

१२.व्यक्तिमहत्व विकास व व्यक्तिमहत्व विकासाच्या दृष्टीने विविध विकासांचे महत्व :
१.क्रियात्मक विकास :-पालथे पडणे,रांगणे,बसणे,उभे राहणे,चालणे,उड्या मारणे,स्नायूवर ताबा आल्यावर विविध खेळ खेळणे.
२.भाषा विकास:रडणे ,हुंकांर देणे,तोंडाने आवाज काढणे,एक शब्द उच्चारणे ,दोन शब्द उच्चारणे ,वाक्य उच्चारणे व अश्खलीत भाषा बोलणे.गुप्त भाषा बोलणे,
३.सामाजिक विकास:-आई,कुटुंब,शेजार ,समाज,शाळा,देशातील विशिष्ट व्यक्तीचा परिचय.
४.भावनात्मक विकास:-दयाळू ,उदार,कंजूस,बहिर्मुख,अंतर्मुख,जिव्हाळा ,हलवेपणा,क्रोध,भीती,जिज्ञासा ,हर्ष,प्रेम,
५.मानसिक विकास:- आपलेपणा ,प्रेम,सुरक्षितता,स्वीकार,स्वतंत्र व्यक्तिमहत्वाचा सन्मान ,मनोरंजन,मित्रसहवास.
६.बौद्धिक विकास:-( पियाजे )
१.० ते २ वर्ष -संवेदनकारक विचार प्रक्रिया .
१. १ महिना ते ४ महिने :-स्वताच्या इद्रियांचा शोध .
२.४ महिने ते १० महिने:-बाह्य वस्तूचा शोध .
३. १० महिने ते १२ महिने :- अनेक क्रियांमध्ये संयोजन.
४.१२ महिने ते १८ महिने :- शोध क्रियाशील व परिस्थिती बदल घडवून आणणे.
५.१८ महिने ते २४ महिने :- शारीरिक क्रीयाद्वाराचे काम मानसिक क्रीयाद्वारे करते.
२.२ वर्ष ते ६ वर्ष -क्रीयापूर्व विचार प्रक्रिया.
३. ६ वर्ष ते १२ वर्ष –मूर्त स्वरूपातील विचार प्रक्रिया .
४.१२ वर्ष ते १४ वर्ष –अमूर्त स्वरुपाची व औचारिक विचार प्रक्रिया.
यातून तर्क ,स्मुर्ती ,अवबोध,संबोध .

१३.शारीरिक विकासात अन्नाचे महत्व :
१.प्रथिने शाकाहारी १३ टक्के व मासाहारी १४ टक्के .
२.चरबी शाकाहारी ३२ टक्के व मासाहारी ३१ टक्के .
३.कार्बोहाड्रेड शाकाहारी ५५ टक्के व ५५ टक्के.
४. सकाळी ६.०० पासून ६.०० पर्यंत विविध गोष्टीचा संतुलित आहार .

१४.बालकाच्या विकासावर परिणाम करणारे घटक :
१.अनुवंश किंवा अनुवंशिकता.
२.वातावरण किंवा परिस्थिती .

१५.अनुवंशिकता व त्याचे प्रकार :
अनुवंशिकता :-वंशपरंपरेने आई –वडिल यांच्या कडून किंवा आजी –आजोबा कडून किंवा पीडयान पिड्यातून अशंत गुण मुलामध्ये येतात त्यास अनुवंशिकता म्हणतात.
१.वैयक्तिक किंवा जैविक अनुवंशिकता: एकाच व्यक्ति कडून गुणधर्म येतात .
उदा-शारीरिक ठेवण ,रंग ,उंची,वजन,बुद्धिमत्ता.
२.सामाजिक अनुवंशिकता:समाजाकडून गुणधर्म मुलामध्ये येतात.
उदा –राहणीमान,भाषा ,रूढी परंपरा.

१६.अनुवंशिकतेने येणारे गुणधर्म :
१.लिंगनिश्चिती:- स्त्रीलिंग/पुल्लिंग
२.जातीसाम्यता: शरीराची ठेवण,रंग ,उंची,वजन.
३.व्यक्तिगत अंतर :-दोन जुळ्या भावातील सर्वच गोष्टी वेगळ्या असतात.
४.वारस: हा वारसा पीडया पीडयातून येतो.
६.उदभव विकास :-बुद्धिमत्तेचे संक्रमण होते.

१७.अनुवंशिकतेचे शिक्षणातील महत्व :
१.स्त्रियांना व पुरुषांना समान वागणूक देणे.
२.काही शारीरिक दोष असल्यास डॉ .कडून दूर करून घेणे.
३.विद्यार्थांचे व्याक्तीभेद लक्षात घेऊन अध्यापन करणे.
४.विद्यार्थांच्या उपजत गुणांना वाव देणे.
५.विद्यार्थांच्या पूर्व ज्ञानाचा उपयोग करून नवीन ज्ञान देणे.

१८.परिस्थिती किंवा वातावरणाचे प्रकार :
वातावरण : आपल्या सभोतालाचा भाग म्हणजे वातावरण होय.
वातावरणाचे प्रकार :
१.नैसर्गिक वातावरण : भौगोलिक रचनाचा संबंध .
२.सामाजिक वातावरण : आई ,कुटुंब ,शेजार,समाज,
३.वैयक्तिक वातावरण : एका व्यक्तीच्या सान्निध्यात राहणे.

१९.बालकाच्या विकासाच्या दृष्टीने योग्य वातावरण महत्व :
१.विद्यार्थांना अनेक गोष्टीतून उपजत गुणांना वाव मिळतो.
२.विद्यार्थात आदर्श निर्माण होऊन प्रेरणा मिळते.
३.विद्यार्थांना शिक्षकांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळते.
४.विद्यार्थासाठी शालेय कार्यक्रमातून वातावरण निर्मिती करता येते.

 

२०.अनुवंश व वातावरण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे आहेत .
अनुवंश गुणीला वातावरण बरोबर शिक्षण होते म्हणून अनुवंश व वातावरण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

२१.बालकांच्या विकासाला पोषक ठरतील असे शाळेतील व शाळेबाहेरील उपक्रम :
१.बालगीते,समूह गीते ,बडबड गीते,बालनाट्के ,-बालकांची भाषा शुध्द होते.बौद्धिक विकास होता.
२.बाग काम :सौदर्यात्मक विकास होतो.
३.चित्र कला,रंग काम,कातरकाम,टाकाऊ वस्तूचा वापर :-या उपक्रमातून सर्जनशीलता निर्माण होते.
४.सांस्कृतिक कार्यक्रम :सामाजिक विकास.
५.पाळीव प्राण्याचे संगोपन :-भावनिक विकास होतो.
६.सहली:-जीवन अनुभव मिळून बौद्धिक विकास होतो.
७.योगासने :-शारीरिक विकास होतो.
८.खेळ व क्रीडास्पर्धा :-शारीरिक विकास होतो.
९.पूरक आहार योजना :-शारीरिक विकास होतो.
१०.ज्ञानद्रीयांना अनुभूतीदेणारे व्यवसाय :-बौद्धिक विकास होतो.
११.तोंडी भाषेचे खेळ :-बौद्धिक विकास व भाषा विकास होतो.
१२.वृक्षारोपण :-सौदर्यात्मक विकास होतो.

२२.स्व'ची जाणीव व त्याचे प्रकार :
स्व'ची जाणीव : बालक वाढते व विकसीत होते तसे तसे त्याचे अनुभव क्षेत्र वाढत जाते .स्पीटझ मते स्व"ताच्या संबंधीच्या अनुभवला स्व'ची जाणीव म्हणतात.पंधराव्या महिन्यात बालकांना स्व'ची जाणीव होते.
स्व'ची जाणिवेचे प्रकार :
१.भौतिक स्व ": आपले शरीर ,घर ,कुटुंब याची जाणीव होणे.
२.सामाजिक स्व':आपले मित्र ,शिक्षक, याची जाणीव होणे.
३.अध्यात्मिक स्व ": सर्व जाणीवा चा समूह .

२३ .स्व 'च्या जाणीवेवर परिणाम करणारे घटक :
१.शारीरिक घटक : कुरूप मुलापेक्षा स्वरूप मुलात अधिक असते.
२.बौद्धिक सामर्थ्य :प्रज्ञावंत मुलांत दिसून येते.
३.मानसिक स्वास्थ :मानसिक स्वास्थ चांगले असलेल्या मुलात दिसून येते.
४.शालेय यशापयश :यशामुळे अभिमान तर अपयशामुळे दुराभिमान वाटतो.
५.पालकांची मनोवृत्ती : पालकांचा अंती लाडामुळे स्व'ची नष्ट होते.
६.लैगिक भिन्नता :मुला मुली समान वागणूक देणे.
७.सामाजिक स्वीकार :-समाजाने मुलांच्या वागणुंकींचा स्वीकार करणे.

२४.बालकांची स्व 'ची जाणीव योग्य प्रमाणे विकसीत व्हावी म्हणून शिक्षक नात्याने करायचे प्रयत्न :
१.कुरूप मुलात न्यूनगंड निर्माण होऊ नये.
२.सामान्य बुद्धीमात्तेच्या मुलांना त्यांच्या गतीने शिकवणे .
३.विद्यार्थांचे मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे.
४.विद्यार्थांना शाळेतील अपयशामुळे वैफल्य निर्माण होऊ नये याची काळजी घेणे.
५.विद्यार्थांना घरच्यावानी प्रेम करावे.
६.सर्व मुला मुलींना समान वागणूक देण्यात यावी .
७.विद्यार्थाच्या चांगल्या वागणुकीचा समाजाने सुद्धा स्वीकार करायला हवा.
व वाईट वागणुकी साठी त्याला मार्गदर्शन करावे.

२५.समायोजन व त्याचे प्रकार :
समायोजन : व्यक्तीने परीस्थीशी मिळते जुळते करणे म्हणजे समायोजन करणे होय.
समायोजानाचे प्रकार :
१.सामान्य समायोजन : आज्ञा पाळणे,नियमाचे पालन करणे.
२.उपसामान्य समायोजन : आज्ञा न पाळणे ,नियमांचे उलंघन करणे.

२६.उपसामान्य किंवा कू –समायोजनाची करणे:
१.कौटुबिक परिस्थिती :घराची आर्थिक परिस्थिती .
२.ईर्ष्या मत्सर :कुटुंबात मुलांना सारखे प्रेम न मिळाल्या मुळे .
३.बौद्धिक पातळी:शाळेतील इतर मुले बुद्धिमान मुलांचा राग करतात.
४.व्यंग : व्यंग असलेल्या मुलात न्यूनगंड निर्माण होतो.
५.संघर्ष : मनाची व्दिधावस्था होते.

२७.बालकांचे समायोजन व्हावे म्हणून शाळेतील उपक्रम / विकास बरोबर समयोजनाची आवश्यकता :
१.घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी चांगले संस्कार मिळायला हवे.
२.कुटुंबात सर्व मुलावर घराच्याने सारखे प्रेम करावे.
३.शाळेत मुले एकमेकांचा द्वेष करत नाही ना यांच्याकडे शिक्षकांने लक्ष द्यावे.
४.अपंग मुलासाठी स्वतंत्र शाळा असावी.
५.विद्यार्थाच्या मनात संघर्ष निर्माण होऊ नये.

२८.सहजप्रवृत्ती :
१९०८ साली विल्यम मकडूगळ ने शोधून काढली.
ज्या विशिष्ट प्रवृतीमुळे एखाद्या व्यक्तीचे अथवा प्राण्याचे एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे लक्ष खेचले जाते.त्याच बरोबर त्याच्या भावनाचे आंदोलन निर्माण होते आणि विशिष्ट वर्तनाची प्रेरणा मिळते त्या प्रवृतीला सहजप्रवृत्ती म्हणतात.

२९.सहजप्रवृत्तीचे वर्गीकरण :
१.संरक्षणासाठी सहजप्रवृत्ती :---
१.युध्द : तिरस्कार रागावणे .
२.पलायन :लपणे ,पळणे,
३.जुगुप्सा : टाळणे,फटकावून लावणे,
४.जिज्ञासा :-शोधणे,पाहणे,
५.संग्रह किंवा संचय : गोळा करणे.
६.अन्न संशोधन : अन्न शोधणे .
७.नवनिर्माण : कृती करणे.

२.वंश निष्ठ सहजप्रवृत्ती : --
१.काम प्रवृत्ती :-मोहित होणे,आकर्षित होणे,
२.वात्सल्य : गांजारणे ,उचलून घेणे.
३.सामाजिक सहजप्रवृत्ती :
१.आत्मप्रवृत्ती :प्रौढकी मारणे.
२.संघ प्रवृत्ती : मैत्री करणे.
३.विनीत : माघे राहणे.
४.याचना : भिक मागणे,देवाची पूजा करणे.
५.हास्य प्रवृत्ती : हसणे.

३०.सहजप्रवृत्तीचे उन्नयन किंवा उदात्तीकरण :
सहजप्रवृतीचे उन्नयन करणे म्हणजे त्याला चांगल्या पातळीवर नेणे.
उदा:-कामप्रवृत्ती :-मोहित होणे,आकर्षित होणे.संस्कृतीची जाणीव निर्माण करून देणे.

३१.सहजप्रवृत्तीचे शिक्षणात महत्व :
१.विद्यार्थाला त्याच्या सहजप्रवृत्ती नुसार शिक्षकाने शिकवावे.
२.विद्यार्थांना प्रोत्साहन द्यावे.
३.विद्यार्थात जिज्ञासा जागृत करावी .
४.विद्यार्थात गोंधळ घालण्याची प्रवृत्ती असते तेव्हा त्याला क्रीडांगणावर अधिक
गोंधळ घालू देणे.त्यांचे लक्ष अपोआप पाठाकडे लागेल.
५.सहजप्रवृत्ती दडपून विद्यार्थात न्यूनगंड निर्माण होतो असे होता कामा नये.
६.तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्या .म्हणजे जोपर्यंत सहजप्रवृत्ती कायम आहे त्यांचा पुरे पूर फायदा घ्या तेव्हाच शिकवा.

३२.सहजप्रवृत्तीवर घेतलेले आक्षेप :
१.सहजप्रवृत्ती उपपत्ती सांगते कारण मिंमास सांगत नाही.
२.मानवी वर्तन व सहजप्रवृत्तीचे चक्रीय विधान आहे.
३.सहजप्रवृत्तीत मानवाच्या वर्तनापेक्षा प्राण्याचे वर्तन अधिक स्पष्ट झाले आहे.कारण मकडूगल यांनी प्राण्यावर प्रयोग केला.
४.सहजप्रवृत्ती काही अंशी चुकीची आहे असे सामाजावाद्याने विधान केले आहे.

३.प्राथमिक स्तरावर विद्यार्थांच्या गरजा व समस्या

१.बालकल्याण व त्याचे मुख्य तत्वे :
बालकल्याण : बालकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी तस्या सोयी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे बालकल्याण होय.बालकल्याण ही संकल्पना बालाशिक्षाणातून मांडली आहे.
बालकल्याणची मुख्य तत्वे :
१.स्वतंत्र व्यक्तिमहत्व :-बालक म्हणजे माणसाची लघु आवृत्ती नव्हे त्याला स्वतंत्र अस्थितत्व आहे.
२.गती:-बालकांची वाढण्याची एक गती आहे.
३.मुलभूत गरजा : घराची मोठी मोठी माणसे पूर्ण करतात.
४.समस्या: आजारपण ,अपंगत्व ,कु -समायोजन .

२.बालकल्याण व बालशिक्षण यांचा संबंध :
बालाशिक्षाणातून
१.विद्यार्थांचे स्वास्थ सुधारणे.
२.विद्यार्थांची ज्ञानात्मक पातळी वाढवणे.
३.विद्यार्थांत अभिरुची निर्माण करणे.
४.विद्यार्थांत अभिवृत्ती निर्माण करणे.
५.विद्यार्थांत सर्जनशीलता निर्माण करणे.

३.संयुक्त राष्ट्र संघटनेने बालकाला दिलेले अधिकार :
१.जन्माच्या वेळी नावं व राष्ट्रीयत्व .
२.आई –वडिल व कुटुंब यांच्या कडून योग्य जबाबदारी पाळली जाणे.
३.आरोग्याची काळजी वाहणे.
४.सकस आहार मिळणे.
५.निवारा व पोषणाचे कर्तव्य समाजाकडून पाळले जाणे.
६.प्राथमिक शिक्षण मोफत मिळणे .
७.खेळाची व्यवस्था होणे.
८.जात,धर्म,भाषा,यांचे रक्षण होणे.
९.शोषणापासून रक्षण होणे.
१०.निराधार व अनाथबालकाची विशेष काळजी वाहणे.

४.बालकल्याणकारी संस्था व त्याची कार्य :
१.मुबईची चिल्ड्रन एड सोसायटी .
२.हजारी बागची पालट रिचर्स सेंटर .
३.बलाकनजी बारीची स्थापना १९२० साली झाली.
४.महिला परिषेदेची बालकल्याण परिषद १९५२ साली स्थापना झाली.
५.संयुक्त राष्ट्र संघटनेने बाल वर्ष १९७९ साजरे केले.
६.छंद केंद्र :-विद्यार्थांच्या विविध कला गुणांन वाव देणे.
७.क्रिडा केंद्र:-विद्यार्थांना विविध खेळ खेळण्यासाठी.
८.पाळणा घर :-घरातील दोघे माणसे नोकरीवर असल्यावर .
९.अनाथालय :-विद्यार्थांना कोणी जवळचे नसल्यावर .
१०.सुधारणा :-बालागुन्हेगारी दूर करणे .

५.विद्यार्थांच्या गरजांचे प्रकार :
१.जैविक किंवा शारीरिक गरजा : अन्न,वस्त्र,निवारा.
२.मानसिक गरजा:-आपलेपणा ,प्रेम,सुरक्षितता,स्विकार,स्वतंत्र व्यक्तीमहत्वाचा सन्मान ,मनोरंजन ,मित्र सहवास.
३.सामाजिक गरजा :-आई ,कुटुंब ,शेजार,समाज,शाळा,देशातील विशिष्ट व्यक्तीचा परिचय.

६.विद्यार्थांच्या गरजापूर्ण न झाल्यास होणारे परिणाम :
१.जैविक किंवा शारीरिक गरजा: कु-पोषण होते,गर्भात होणे.
२.मानसिक गरजा:-कुढी बनतात,एकलकोंडे बनतात.
३.सामाजिक गरज:-कु-समायोजन होऊन गुन्हेगारी वृतीकडे ओळखतात.

७.विद्यार्थांच्या गरजा लक्षात घेऊन शाळेत योजावयाचे उपक्रम :
१.विद्यार्थांना शाळेतून पाट्या,वह्या ,पुस्तके ,गणवेश मोफत देणे.
२.विद्यार्थांना प्रेमाने वागवणे.
३.विद्यार्थांना सामाजिक कार्यात सर्वांना संधी देणे.

८.विद्यार्थांच्या समस्या :
१.अनुवंशिक समस्या :
१.शारीरिक दोष व अपंगत्व :विद्यार्थांना पोषक व पुरेसा आहार न मिळणे .
२.मंदबुद्धीतत्व :विद्यार्थांचा स्वत:च्या वर्तनावर ताबा नसतो.
३.शारीरिक विकार : विद्यार्थांत मधुमेह ,दमा,क्षरोग इत्यादी आजार अनुवंशिक मुळे येतात.

२.परिस्थितीजन्य समस्या:-
१.बालगुन्हेगारी :-विद्यार्थांच्या घराची आर्थिक परिस्थिती मुळे.
२.व्यसने:-विद्यार्थांना वाईट मित्रांच्या संगती मुळे.
३.वर्तन समस्या:-न्यूनगंड,अहंगंड,हिंसा ,चोरी ,मारामारी करणे,इत्यादी वर्तन समस्या आहेत.

९.नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांच्या समस्या त्यावर उपाय:
१.नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी शिक्षकांने शाळेत नवागताचे स्वागत कार्यक्रम घेणे.
२.त्यांचा सर्व वर्ग मित्राशी परिचय करून देणे.
३.त्यांना आवडतील त्या गोष्टी शिकवणे उदा-बालगीते .
४.विद्यार्थांच्या स्वास्थाची काळजी घ्यावी .
५.विद्यार्थांना घरच्यावानी प्रेम करावे.

१०.शाळा बाह्य विद्यार्थांच्या समस्या व त्यावर उपाय:
१.विद्यार्थांना आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती देणे.
२.विद्यार्थांची बेकारी नष्ट करण्यासाठी नोकरी देणे.
३.विद्यार्थांसाठी सकस आहार योजना राबविणे .
४.विद्यार्थांच्या पालकांचे अज्ञान दूर करणे.
५.विद्यार्थांना शहरी झगमगाटी पासून दूर ठेवणे.
६.विद्यार्थांना चांगले संस्कार देणे.

११.निरक्षर पालक असलेल्या विद्यार्थांच्या समस्या व त्यावर उपाय :
१.निरक्षरता चे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करणे.
२.निरक्षरता कमी करण्यासाठी प्रौढ शिक्षण घेणे.
३.पालकांची जागृती करणे.
४.शिक्षक-पालक संघटना ,माता-पालक संघटना स्थापना करणे.
५.विद्यार्थांना शाळेत चांगले संस्कार करणे.
६.विद्यार्थांसाठी वस्तीगृहांची सोय करणे.

१२.भिन्न सामाजिक वातावरणातून आलेल्या विद्यार्थांच्या समस्या व त्यावर उपाय:
१.विद्यार्थांसाठी निकोप वातावरणाची निर्मिती करणे.
२.विद्यार्थांना कळेल त्या भाषेत शिकवणे.
३.विद्यार्थांतील न्यूनगंड दूर करणे.
४.विद्यार्थांना प्रोत्साहन देणे .
५.विद्यार्थांना विविध सोयी उपलब्ध करून देणे.
विद्यार्थांना सहानुभूतीची वागणूक देणे.

१३.शारीरिक व्यंग असणाऱ्या विद्यार्थानाच्या समस्या व त्यावर उपाय:
१.अपंग मुलासाठी स्वतंत्र शाळा असावी.
२.विद्यार्थांत शारीरिक दोषामुळे विकलांग निर्माण होणार नाही काळजी घेणे.
३.विद्यार्थात शारीरिक दोषामुळे न्यूनगंड निर्माण होऊ नये.
४.विद्यार्थांचा आत्मविश्वास कमी होऊ नये.
५.विद्यार्थांत असुरक्षिततेची भावना बळावू नये.

१४.मानसिक दौर्बल्य असलेल्या विद्यार्थांच्या समस्या व त्यावर उपाय:
१.जडबुद्धी :-सामान्य मुलांबरोबर शिक्षण होत नाही म्हणून स्वतंत्र शाळा किंवा स्वतंत्र तुकडी असावी .
२.अल्पबुद्धी : स्वताहून कोणतेच काम करता येत नाही म्हणून शिक्षकाने वेळोवेळी मार्गदर्शन करावे.
३.मंदबुद्धी : साधारण हलकी फुलकी कामे करू शकतात.म्हणून त्यांच्या आवडीनुसार शिकवावे .
४.साधारणबुद्धी :शिक्षण मंदगतीने होते म्हणून या मुलांना यांच्या गतीने जाण्याची सोय असावी.

१५.प्रज्ञावान किंवा वैशिष्टपूर्ण बालकांच्या समस्या व त्यावर उपाय:
१.अभ्यासक्रम हा सर्व सामान्य मुलांना दृष्टीसमोर ठेवून तयार केलेला असतो म्हणून ह्या मुलांना काही भाग महत्वाचा वाटत नाही तेव्हा यांच्या साठी स्वतंत्र शाळा असावी उदा:- नवद्य विद्यालय .
२.जर विद्यार्थांना स्वतंत्र शाळा नसेल तर आपलाच शाळेत "अ' वर्गाच्या तुकडीत अशा मुलांनाचा प्रवेश निश्चित करावा.
३.जर शाळा अपुरी असेल तर या मुलांना सर्व सामान्य मुलांपेक्षा अधिक काम देण्यात यावे उदा:- रिकाम्या वेळेत दुसऱ्या मुलांना गणित शिकवणे.

१६.भिन्न –भिन्न प्रवृत्तीच्या मुलासाठी भिन्न –भिन्न प्रकारच्या शाळा हव्यात :
१आंधळ्या मुलांसाठी शाळा:-डॉ ब्रेल ची लिपी गाणे म्हणणे वाद्य वाजवणे ,स्वत:च्या पायावर उभे राहून चालणे.
२.बहिऱ्या मुलांसाठी शाळा :-चित्रकला,पेंटिंग ,सुतारकाम ,टेलरिंग ,
३.वेडसर मुलांसाठी शाळा:-मातीची खेळणी ,चटया विणणे ,कागद काम करणे.
४.मंद मुलांसाठी शाळा :-चित्रकला ,रंगकाम ,कागद काम,टाकाऊ वस्तूपासून विविध वस्तू बनविणे.
५.सामान्य मुलांसाठी :-श्रवण,भाषण ,वाचन,लेखन.

४.मानसिक स्वास्थ

१.मानसिक स्वास्थ व त्याचे लक्षणे :
१.व्यक्तीमहत्वाचे विविध पैलू मध्ये सुसंवाद म्हणजे मानसिक स्वास्थ होय.
२.मानसिक स्वास्थ म्हणजे मनाचे आरोग्य होय.
३.स्वता:बदल आत्मविश्वास म्हणजे मानसिक स्वास्थ होय.
मानसिक स्वास्थाची लक्षणे :
१.निर्मळ ,संतुलित ,स्वच्छ ,बलशाही शरीर व मन हे मानसिक स्वस्थाचे लक्षण होय.
२.मानसिक स्वास्थ असलेली व्यक्ती संतुलित आहे.
३.मानसिक स्वास्थ असलेली व्यक्ती चांगल्या गोष्टीत दोष काढत नाही.
४.मानसिक स्वास्थ असलेली व्यक्ती दुसऱ्याचा अकारण हेवा करत नाही.

२.मानसिक अस्वास्थ व त्याचे लक्षणे :
मानसिक अस्वास्थ : मन विकृत बनणे म्हणजे मानसिक अस्वास्थ होय.
मानसिक अस्वास्थ लक्षणे :
१.घाणेरडे:असंतुलित ,अस्वच्छ् व दुर्बल शरीर व मन म्हणजे मानसिक अस्वस्थाचे लक्षण होय.
२.मानसिक अस्वास्थ असलेली व्यक्ती संतुलित नसते.
३.मानसिक अस्वास्थ असलेली व्यक्ती चांगल्या गोष्टीत दोष काढते.
४.मानसिक अस्वास्थ असलेली व्यक्ती दुसऱ्यांचा अकारण हेवा करते.

३.मानसिक अस्वास्थाची करणे:
१.गरजाची पूर्ती न होणे:- अन्न,वस्त्र,निवारा.
२.अपयश : शाळेतील अपयशामुळे.
३.वर्चस्वभावना:-घरी,दारी,शाळेत,वर्चस्व गाजवणे.
४.मान्येतीची आकांक्षा :-पैसा व सत्ता मिळवण्याचा धडपड.
५.कु-समायोजन :-परिस्थितीशी मिळते जुळते करता येत नाही.
६.भग्न कुटुंबे : घरातील आई –वडिल यांचे सतत भांडणामुळे.
७.निराशा: अशा असून निराशा होते.
९.संघर्ष : मनाची व्दिधा अवस्था होते.हे मानवी जीवनाचे वैशिष्टे आहेत.यालाच मानसिक ताणाचा राजा म्हणतात .
१.हे ही हवे-ते ही हवे.
२.हे ही नको-ते ही नको.
३.दोन्ही हवे –दोन्ही नको .

४.मानसिक अस्वास्थाचे अध्ययन–अध्यापनावर होणारे परिणाम :
१.विद्यार्थाच्या गरजाची पूर्तता न झाल्यास कु-पोषण होते.त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही.
२.विद्यार्थांच्या अपयशामुळे पुढील शिक्षण घेणे कठीण होते.
३.विद्यार्थात वर्चस्व भावना निर्माण झाल्यास मानसिक अस्वास्थ निर्माण होते.
४.विद्यार्थांना समाजाने मान्यता न देल्यामुळे समाज विघातक वर्तन करते.
५.विद्यार्थांना परिस्थितीशी मिळते जुळते करता येत नाही म्हणून शिक्षणात लक्ष लागत नाही.
६.विद्यार्थान मध्ये रोजच्या घरातील आई वडिलांच्या भांडणामुळे मानसिक अस्वास्थ निर्माण होते.
७.विद्यार्थी इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळे वैफल्य निर्माण होते.
८.विद्यार्थांच्या काही अशा असतात पण त्यापूर्ण होत नाहीत म्हणून निराशा निर्माण होऊन कोणतेही काम व्यवस्थित करता येत नाही.
१०.विद्यार्थांच्या मनाची द्विधा अवस्था निर्माण होऊन त्यात संघर्ष निर्माण होतो व हा अध्ययन –अध्यापनच्या दृष्टीने अतिशय घातक असतो.यामुळे विद्यार्थात मानसिक ताण निर्माण होतो व मानसिक अस्वास्थ निर्माण होते.

५.विद्यार्थांचे मानसिक स्वास्थ राखण्यासाठी शिक्षकाने योजावयाचे उपाय किंवा मानसिक स्वास्था चे शैक्षणिक दृष्ट्या महत्व :
१.विद्यार्थांच्या गरजाची पूर्तता होण्यासाठी शाळेत सकस योजना राबविणे .
२.विद्यार्थांचे अपयश अन्य कारणाने भरून काढणे.
३.विद्यार्थात वर्चस्व भावना निर्माण होऊ नये.
४.विद्यार्था संबंधी समाजाला शिक्षकाने मार्गदर्शन करावे.
५.विद्यार्थांना परीस्थितीशी मिळते जुळते करण्यासाठी शाळेत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करावे.
६.विद्यार्थांच्या पालकांच्या वेळोवेळी भेटी घेण्यात याव्यात.
७.विद्यार्थात स्व'ची जाणीव निर्माण करून नंतर विद्यार्थाची मानसिक सांत्वन करावी . व त्यांच्या समोर आदर्श व्यक्तीचे चरित्र व कर्तुत्व त्यांच्या समोर वाचून दाखवावे.
८.विद्यार्थांच्या अशा ,आकांक्षा लक्षात घेऊन त्यांच्या मतांने कार्य करण्याची संधी शिक्षकांनी द्यावी .
९.विद्यार्थांच्या मनातील संघर्ष दूर करावा.

६.विद्यार्थाचे मानसिक स्वास्थ राखण्यासाठी शाळेने योजावयाचे उपाय:
१.योग्य वातावरण निर्मिती करणे.
२.विविध उपक्रमाचे आयोजन करणे.
३.प्रथामोपराची सोय करणे.
४.मानसिक आरोग्य केंद्राची स्थापना करणे.

७.विद्यार्थांचे मानसिक स्वास्थ राखण्यासाठी कुटुंबाने योजावाचे उपाय:
१.कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली करणे.
२.कुटुंबातील सगळ्या मुलांवर सारखे प्रेम करावे.
३.कुटुंबाने मुलांवर चांगले संस्कार करावे.
४.कुटुंबाने मुलाच्या गरजाची पूर्तता करावी.

८.संरक्षण यंत्रणा व ती निर्माण होण्यासाठी करणे किंवा मानसिक ताण कमी करण्याचे करणे.
मानसिक अस्वास्थामुळे संरक्षण यंत्रणा निर्माण होते.
१.कृतक किंवा मिथ्या समर्थन :आपल्या चुकीची कबुली देणे.
२.प्रक्षेपण :आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या फोडणे.
३.प्रतीपुरण: आपल्या अपयश अन्य कारणाने भरून काढणे .
४.तादात्म्य : आपल्या उणीवा झाकण्यासाठी दुसऱ्याचे उदा.देणे.
५.विस्थापन : आपल्या राग दुसऱ्यावर काढणे.
६.दिवा स्वप्न : आपल्या कडून काहीच होत म्हणून दिवा स्वप्न पाहणे.
७.विपरीत रुपण : आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडणे .
८.परागमन: आपले दुख विसरण्याचा प्रयत्न करणे.
९.दमण : आपल्या इच्छा ,आकांक्षा ,बळजबरीने दाबून टाकणे.
१०.उदात्तीकरण : आपण चांगल्या पातळीवर काम करावे.

९.अभ्यासक्रम व मानसिक स्वास्थ संबंध :
१.अभ्यासक्रम अखातांना मानसिक स्वस्थांचा दृष्टीकोन असावा.
२.विद्यार्थांचे वय,आवडी निवडी,अनुभव विश्व ,आकलन क्षमता,बौद्धिक स्तर लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची मांडणी करणे.

१०.अध्यापन पध्दती व मानसिक स्वास्थ :
१.शिक्षकांने योग्य अध्यापन पद्धतीचा उपयोग करावा.
२.शिक्षकांचे परिणामकारक अध्यापन करण्यासाठी आचुक अध्यापन पध्दतीची निवड करावी .
३.शिक्षकांनी सचेतन अध्यापन करण्याचा प्रयत्न करावा.
४.शिक्षकांनी अध्यापनात शैक्षणिक साधनांचा वापर करावा.

११.शाळेतील प्रशासन व मानसिक स्वास्थ :
१.विद्यार्थांसाठी लोकशाही पध्दतीचा अवलंबन करणे.
२.विद्यार्थांना स्वत:निर्णय घेण्याचे स्वतंत्र देणे.
३.विद्यार्थांना इच्छा प्रमाणे कार्य करण्याची संधी देणे.
४.विद्यार्थांना चांगल्या गोष्टीबद्दल प्रोत्साहन देणे.
५.विद्यार्थांची चांगल्या गोष्टीत जिज्ञासा वाढवणे.
६.विद्यार्थांत योग्य सामाजिक अंतर क्रिया घडून आणणे .

१२.मानसिक स्वास्थ व शिस्त यांचा संबंध :
१.विद्यार्थांना शिक्षा करू नये.
२.विद्यार्थांना चांगल्या गोष्टीबद्दल प्रबंलन द्यावे.
३.विद्यार्थांच्या चुका लक्षात आणून देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे.
४.विद्यार्थांच्या समोर शिक्षक स्वत:शिस्त प्रिय असावा.

१३.मानसिक स्वास्थ व आवश्यक सेवा:
१.बालसंस्कार केंद्र.
२.बालमार्गदर्शन केंद्र.
३.शालेय समाज कार्य .
४.शालेय सकस आहार योजना.
५.शालेय वैदकिय तपासणी .
६.शालेय मानसोपचार .

५.अध्ययन प्रक्रिया

१.अध्ययन प्रक्रिया :
ज्या क्रियामुळे आपल्या अनुभवाद्वारे कृतीद्वारे विशिष्ट हेतूच्या प्राप्तीसाठी आपल्या वर्तनात बदल घडवून येतो,परिणाम तो हेतू साध्य करण्यासाठी आपण परीस्थिशी व काही ज्ञान ,कौशल्य ,अभिवृत्ती संपादन करतो.

२.अध्ययन प्रक्रियेचे अंगे किंवा स्वरूप :
१.उद्दिष्टे : आपले ध्येय साध्य करण्याचा मार्ग .
२.प्रेरणा: स्फूर्ती किंवा चालना होय.
३.शोधण : उद्दिष्टे गाठण्यासाठी नेमका मार्ग शोधणे.
४.समायोजन : उद्दिष्टे गाठण्यासाठी परीस्थिशी मिळते जुळते करणे.
५.पुनर्रचना: प्रतिक्रियेची पुनर्रचना करणे.

३.अध्ययनाचे प्रकार :
१.शाब्दिक अध्ययन : शब्दाच्या साह्याने होते.उदा-दैनंदिन व्यवहारात अर्थपूर्ण बोलणे.
२.कारक अध्ययन : विशिष्ट हालचालीवरून कौशल्य प्राप्त करणे. उदा- सायकल चालवणे.
३.समस्या सोडवणे: आचुक प्रक्रियेचा अवलंबन करून शिकणे उदा-चुका आणि शिका

४.अध्ययन वक्र व त्याचे प्रकार व टप्पे :
१.विशिष्ट कौशल्य संपादन करतांना व्यक्तीने केलेली प्रगती व अनुशिल यातील परस्पर संबंध म्हणजे अध्ययन वक्र होय.
अध्ययन वक्राचे प्रकार :
१.ऋण वेग .
२.धनवेग.
३.प्रथम धन नंतर ऋण वेग .
अध्ययन वक्राचे टप्पे :
१.मंद गतीचा काळ .
२.जलद गतीचा काळ.
३.पाठरावस्था:-शिकणाऱ्याच्या प्रगती पथावरील शून्य प्रगतीचा टप्पा म्हणजे पठार अवस्था.
४.चढ –उताराचा काळ.
५.अध्ययन परिसीमा ओळखणे.

५.थोर्नडाईक चे अध्ययनाचे नियम:
१.सज्जतेचा किंवा तत्परतेचा नियम: शरीराच्या व मनाच्या अनुकूल अवस्थेला तत्परता म्हणतात ही परिपक्वता नंतर येते.तिच्या शिवाय अध्ययन होत नाही.तत्परता ही परिपक्वतेवर अवलंबून आहे. उदा- बालवाडीत आल्याबरोबर मुलांना वाचन लेखन शिकवू नये.
२.सरावाचा नियम: practice makes man perfect म्हणून केलेल्या अभ्यासाचा अधिक अधिक पुनरावृत्ती केली असता.त्यात सुबक कौशल्य प्राप्त होते.
उदा- सायकल चालवतांना प्रथम त्रास होतो पण अधिक सराव केल्यास आपण हेडल वरील हात सोडून नंतर सायकल चालवतो.

३.परिणामाचा नियम: एखाद्या कृतीतून वाईट किंवा चांगला परिणाम होते .त्यालाच परिणाम म्हणतात.
उदा- मुलांना चांगल्या कामाबद्दल बक्षीस प्रबलंन देल्यास त्यांना प्रोत्साहन मिळते.
वाईट कामाबद्दल रागावले ,मारले तर ती कृती ते पुन्हा करत नाहीत.

६.अध्ययन संक्रमण व त्याचे प्रकार :
अध्ययन संक्रमण: अनुभवाचे स्थलांतर होणे एखाद्या परिस्थितीत मिळवलेले ज्ञान ,कौशल्ये हे दुसऱ्या परीस्थितचे ज्ञान,कौश्याल्ये घेण्यास उपयुक्त ठरते त्याला अध्ययनाचे संक्रमण म्हणतात.
अध्ययन संक्रमण प्रकार :
१.धन संक्रमण : सायकल चालवण्यापासून मोटार सायकल चालवता येते.
२.ऋण संक्रमण : चांगले लेखन असणारा चांगले पोहू शकत नाही .
३.शून्य संक्रमण : एखाद्या गोष्टीचा उपयोग दुसऱ्या गोष्टीला होत नाही .
मराठीचे ज्ञान असल्यास इंग्रजी शिकण्यासाठी त्यांचा उपयोग होत नाही .

७.संक्रमण संबंधी निरनिराळी उपपत्ती :
१.शक्तीवादीची उपपत्ती : व्याकरण ,तर्क शास्त्र शिकण्यासाठी उपयुक्त आहे.
२. थोर्नडाईकची उपपत्ती :सामान्य घटक व उपघटक म्हणून धन संक्रमण होते.
३.जड ची उपपत्ती: सामान्यीकरण करण्याची उपपत्ती .
४.वूडवर्थची उपपत्ती : समरूप घटकाची उपपत्ती.
५.बंग्लेची उपपत्ती : सहेतून कृती करण्याची उपपत्ती.
६.बोडेची उपपत्ती: जुन्या अनुभवाला नवा अनुभव सहसंबंध जोडणे.

८.संक्रमण होणारे घटक:
१.ज्ञान : संस्कृतचे ज्ञान असेल तर मराठी व हिंदी लवकर शिकता येते.
२.तंत्र ,पद्धती ,कौशल्य : तबला वाजवणारा चांगली ढोलकी वाजू शकतो.
३.विशिष्ट दृष्टी व निष्ठा मूल्य: नेहमी खरे बोलणारा खोटे कधीच बोलत नाही चांगले आचरण करणारा वाईट आचरण कधीच करत नाही.

९.संक्रमणाचे फायदे :
१.विद्यार्थात नवीन कौशल्य येतात.
२.विद्यार्थांना सामान्यीकरण करण्यास मदत होते.
३.विद्यार्थांवर चांगले संस्कार करण्यास मदत होते.
४.विद्यार्थात आत्मविश्वास व ध्येय प्रवणता हे गुण येतात.
५.विद्यार्थांत अभ्यासाविषयी आवड निर्माण होते.

१०.संक्रमणाचा शिक्षणावर होणारे परीणाम:
१.अभ्यास क्रमवार होणारा परिणाम .
१.अभ्यासक्रम तयार करतांना संक्रमणचा विचार हावे.
२.विद्यार्थांचे वय,आवडीनिवडी ,अनुभव विश्व,आकलनक्षमता ,व बौद्धिक स्तर लक्षात घेऊन काही घटकाचे संक्रमण आपल्याला करता येईल यांचा विचार करावा.

२.संक्रमणाचा अध्ययन पध्दतीवर होणारा परिणाम:
१.शिक्षकांने योग्य अध्यापन पध्दतीचा उपयोग करावा.
२.शिक्षकांने परिणामकारक कारक अध्यापन करण्यासाठी आचुक अध्यापन पध्दतीची निवड करावी.
३.शिक्षकांने अध्यापन सचेतन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
४.शिक्षकांने अध्यापनांची सूत्रे वापरून शैक्षणिक साधन सह अध्यापन करावे.

३.संक्रमणाचा वेळापत्रकावर होणारा परिणाम:
१.शालेय कार्याचा आढावा देणारा वेळापत्रक हा आरसा आहे.
२.शाळेत सप्ताहाचे वेळापत्रक असते.
३.वेळापत्रकामुळे अध्ययन –अध्यापनात सुत्रातता व नियमितपणा येतो.
४.विषयाची विभागणी .
५.तासाचा अवधी कळतो.
६.कठीण विषयाला वेळापत्रकात प्रथम स्थान द्यावे.
७.विद्यार्थांच्या शारीरिक व मानसिक योग्यता लक्षात घेऊन तासिकेचे नियोजन करावे.

११.अध्यानाच्या पध्दती व त्याचे वैशिष्टे व मर्यादा :
१.अनुकरण पध्दती (हेगार्टी ):दोन माकडावर प्रयोग
१.अनुकरण निरीक्षणावर अवलंबून आहे.
२.अनुकारांचा कौशल्य संपादन करण्यासाठी उपयोग होतो.
३.अनुकरण भाषा शिक्षण्यासाठी उपयुक्त आहे.
४.ज्ञान संपादन करता येत नाही.
५.नवनिर्मिती क्षमतेला वाव नाही.
६.विद्यार्थांच्या स्वतंत्र बुद्धीला आवस कमी आहे.
२.प्रयत्न प्रमाद पध्दती (थोर्नडाईक): मांजरावर प्रयोग .
१.चुका आणि शिका असे शिकता येते.
२.प्रयत्न प्रमाद पध्दतीने कौशल्य प्राप्त होते.
३.प्रयत्न पध्दतीने क्रिया सफाई होते.
४.प्रयत्न प्रमाद पध्दतीने शिकण्यास फार वेळा लागतो.
५.प्रयत्न प्रमाद पध्दतीत यश योगायोगानेच येते.
६.प्रयत्न प्रमाद पध्दतीत प्राप्त कौशल्याचे संक्रमण होते असे नाही.
३.अभिसंधान पध्दती (पावलाव ) कुत्रावर प्रयोग .
१.चेतक व प्रतिक्रिया याचे सहचर्य असते.
२.अनेक सवयी लावण्यास उपयुक्त पध्दती आहे.
३.प्रलोभनामुळे कृतीला प्रेरणा मिळते.
४.वैयक्तिक स्वतंत्र नष्ट होते.
५.मनुष्य यांत्रिक बनतो.
६.मनाला स्थान नाही यावर आक्षेप घेतले जातात.

४.मर्मदृष्टी पध्दती (कोहलर) सुलतान नावाचे माकड यावर प्रयोग केला.
१.समस्येवर लक्ष केंद्रीत होते.
२.मर्मदृष्टी ही अंतरदृष्टी आहे.
३.युक्तिवाद करावा लागतो.
४.मानसिक क्रियेवर अवलंबून आहे.
५.मर्मदृष्टी ही बाह्यदृष्टी नसते.
६.युक्तिवादाची मर्मजाणण्याची तयारी हवी.

१२.अध्ययनावर परिणाम करणारे घटक:
१.परिपक्वता.
२.प्रेरणा.
३.अवधान.
४.अभिरुची .
५.स्मरण व विस्मरण.
६.थकवा व कंटाळा.
७.सवय.

 

१३.अध्ययन परिपक्वतेवर अवलंबून आहे:
परिपक्वता म्हणजे शरीराच्या अवयवात व गुणात नैसर्गिकरित्या परिपूर्णता येणे म्हणजे परिपक्वता होय.परीपाक्वतेशिवाय अध्ययन होत नाही म्हणून अध्ययन हे परीक्वतेवर अवलंबून आहे.

१४.प्रेरणेचे अध्ययनातील स्थान:
प्रेरणा : प्रेरणा म्हणजे स्फूर्ती किंवा चालना होय ती गरजेतून मिळते.
१.आंतरिक प्रेरणा: अभिरुची ,अभिवृत्ती व तत्परता यातून मिळते.
२.बाह्य प्रेरणा: प्रलोभनातून मिळते प्रलोभन म्हणजे लालूच होय.

१५.अवधान व त्याचे प्रकार व घटक :
अवधान : अनेक चेताकापैकी एक चेतक निवडून त्यावर सर्व जाणीवा केंद्रीत करणे म्हणजे अवधान देणे होय.
अवधान प्रकार :
१.ऐच्छिक अवधान : परीक्षेत पास होण्यासाठी पाठांतर करणे.
२.अनैच्छिक अवधान : शिक्षक वर्गात शिकवत असतांना अचानक ढगात विजेचा कडकडाट झाला अवधान तिकडे गेले.
३.अभ्यस्त अवधान : ह्या अवधानासाठी एखाद्या विषयाची आवड असावी लागते.

अवधानाचे घटक :
१.आंतरिक घटक : मनस्थिती ,गरज,सवय,अभिरुची इत्यादी अवधानाचे आंतरिक घटक आहेत.
२.बाह्य घटक : जाणीव केंद्रीत करणे,लक्ष देणे इत्यादी अवधानाचे बाह्य घटक आहेत.

१६.अध्ययनावर परिणाम करणारा घटक अभिरुची :
१.विद्यार्थांमध्ये अभिरुची निर्माण करणे व ती विकसीत करणे हे अध्यापनाच्या दृष्टीने आवश्यक असते.
२.अनुभवाद्वारे अभिरुची बदल असते.
३.अवधान हे अभिरुचीचे प्रगट रूप आहे.तर अभिरुची हे अवधानाचे सुप्त रूप आहे.
४.अवधान व अभिरुची ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.

१७.स्मरणाचे लक्षणे व विस्मरणाचे :
स्मरण व विस्मरण : स्मरण करणे म्हणजे आठवणे व विस्मरण विसरणे.
१.स्मरणाचे लक्षणे :
१.एखाद्या विषयाची आवड निर्माण होणे.
२.एखादी गोष्ट होऊन बराच काळ झाला तरी ती लवकर आठवणे.
३.जुन्या अनुभवातून नवा अनुभव घेऊन शिकणे.
४.पाठ्य विषय चटकन ग्रहण होणे व खूप दिवस धारणा ठेवणे.
५.दुखत अनुभव जाणीवेतून नेणीवेतून ठेवणे.
२.स्मरणाचे शैक्षणिक दृष्ट्या महत्व किंवा मुलांच्या अभ्यास लक्षात राहावे म्हणून लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.शिकण्याची तीव्र इच्छा .
२.अवधान .
३.अभिरुची .
४.महत्वाचे मुद्दे वारंवार समजावून देणे.
५.माहितीचे वर्गीकरण व संयोजन करणे.
६.सहचर्य संबंध जोडणे.
७.विश्रांती घेणे.
८.पाठांतर करणे.
९.मनन करणे.
१०.उजळणी करणे.

३.विस्मरणाचे करणे:
१.अनास्था : विषयाची आवड नसणे .
२.कालगमण: एखादी गोष्ट होऊन खूप दिवस झाल्यास ती न आठवणे .
३.निरोधन : जुन्या व नव्या अनुभवाचा दवंदव तयार होणे.
१.पुरोगामी निरोधन : जुना अनुभव हा नव्या अनुभवाला घातक ठरतो तेव्हा .
२.प्रतिगामी निरोधन : नवा अनुभव हा जुन्या अनुभवाला घातक ठरतो तेव्हा.

४.झोप : झोपे मुळे विस्मरण होते पण धारणा पक्की होते.
५.दमन : फ्राईड च्या विस्मरण होते नाही दुखद अनुभव हे जाणीवेतून नेणीवेत जातात.

१८. अध्ययनावर परिणाम करणारा घटक थकवा व कंटाळा :
थकवा: म्हणजे कार्यशक्तीची पूर्ण झिंज होणे व कंटाळा म्हणजे एखादे काम नकोसे वाटणे.
थकव्याचे प्रकार :
१.शारीरिक थकवा:
२.मानसिक थकवा म्हणजे कंटाळा होय.

१९.सवय व त्याचे प्रकार :
सवय : एखादी कृती शरीराकडून किंवा मनाकडून वारंवार घडणे त्याला सवय म्हणतात.
सवयीचे प्रकार :
शारीरिक सवय : सकाळी उठल्यावर चहा घेणे.
२.मानसिक सवय: हरिपाठ वाचून नंतर चहा घेणे.

६.अध्यापन प्रक्रिया

१.अध्यापन प्रक्रिया :
डिक्सनरी ऑफ एज्युकेशन : औपचारिक रित्या शाळेत येणाऱ्या व अनौपचरिक रित्या उपक्रमात सहभागी असणाऱ्या प्रसंग परिस्थिती उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यापन प्रकिया.

२.अध्यापन एक कला आहे व शिक्षक मोठा कलावान आहे:
१.अध्यापन एक कला आहे शिक्षक मोठा कलावान आहे.
२.अध्यापन म्हणजे अध्ययन करण्यास प्रवृत्त करणे.
३.विद्यार्थांचे अध्ययन घडवून येण्यासाठी अध्ययनासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करणे.
४.विद्यार्थांत वर्तन परिवर्तन घडवून आणण्यासाठी जे काही नियोजन करावे लागते,प्रोत्साहन द्यावे लागते ,पध्दती वापरावी लागते तो सर्व खटाटोप म्हणजे अध्यापन होय.

३.अध्यापन सौदर्य व वर्ग नियंत्रणासाठी त्याचा उपयोग :
१.शिक्षकांनी हसत मुद्रेने वर्गात प्रवेश करणे.
२.शिक्षकांनी विद्यार्थांना कळेल त्या भाषात शिकवणे.
३.शिक्षकांनी विद्यार्थांना कविता चालीवर म्हणून दाखवणे.
४.शिक्षकांने विद्यार्थांना नाट्य शिकवतांना स्वरात चढ उतार चेहऱ्यावर हावभाव व पत्रानुसार भाषण करावे.
५.शिक्षकांने स्पष्टीकरण करतांना चित्राचा वापर करणे.
६.शिक्षकांने विद्यार्थांना जास्तीत जास्त प्रशोत्तर पद्धतीने शिकवणे यालाच अध्यापन सौदर्य म्हणतात.
७.अनुभव विश्वाला धरून केलेले अध्यापन सौदर्य होय.

४.परिणामकारक अध्यापन
परिणामकारक अध्यापन म्हणजे अचूक अध्यापन पद्धती ,शैक्षणिक साधने ,अनुभव याचे सूत्र बुध्द गुंपण करून केलेले अध्यापन म्हणजे परिणाकारक अध्यापन .
१.विद्यार्थाचे क्षमता.
२.विद्यार्थाचे पूर्वज्ञान .
३.विद्यार्थाची गरज व आवड.
४.अध्यापनाची उद्दिष्टे.
५.विषयाचे स्वरूप .
६.अध्यापन साहित्य.

 

५.सचेतन अध्यापन :
शिक्षक हा घटक सजीव आहे व दुसरा घटक विद्यार्थी हा सजीव आहे.
म्हणून सजीवाचा –साजीवाशी येणाऱ्या संबंधाला सचेतन अध्यापन म्हणतात.शिक्षकांने सचेतन अध्यापन होण्यासाठी प्रयत्न शील राहावे.

६.पूर्वप्राथमिक स्तरावरील अध्यापन पद्धती :
१. ३ ते ६ वयोगटातील मुलांना दिले जाणारे अनौपचारिक शिक्षण म्हणजे पूर्वप्राथमिक शिक्षण होय.
२.पूर्व प्राथमिक शिक्षणाची कल्पना अनुताई वाघ याने काढली .त्यांचा जन्म १९१० कोसबाड येथे झाला.
३.पूर्व प्राथमिक स्तरावर मुलांना शिक्षण देतांना संश्लेषण पध्दती वापरावी म्हणजे अक्षर ,शब्द ,व्याक्य असे शिकवावे.
४.बलाद्योन पध्दती जनक फ्रोबेल आहे.आवड,अनुभव विश्व ,आकलन क्षमता,बौद्धिक स्तरानुसार विविध छंद व क्रिडा प्रवृत्ती करण्यास प्रोत्साहन देणे म्हणजे बलाद्योन होय.

७.प्रोढासाठी अध्यापन पद्धती :
१.निरक्षर लोकांना साक्षर बनविण्यासाठी दिले जाणारे शिक्षण म्हणजे प्रौढ शिक्षण होय.
२.प्रौढसाठी अध्यापन करतांना विश्लेषण पध्दती वापरावी वाक्य,शब्द,अक्षर यांची ओळख करू देणे.
३.प्रौढांना वाचन ,लेखन ,अंकज्ञान व्यवहार पुरते,शिकवणे.
४.प्रौढशिक्षणाची उद्दिष्टे कार्यकुशलता जाणीव जागृती ,साक्षरता होय.

८.अध्यापन सूत्रे किंवा अध्ययन प्रक्रियेचे शैक्षणिक सिद्धांत :
१.सोप्या कडून काठीणाकडे: सुगामाकडून दुर्गामाकडे शिकविणे विद्यार्थाचे वय,आवडी ,निवडी,अनुभव विश्व,आकलन क्षमता बौद्धिक स्तर याला झेपल तेच मुलांना शिकवणे.
उदा-एकदम बेरीज ,वजाबाकी न शिकविता प्रथम अंकज्ञान शिकवणे.
२.ज्ञाताकडून अज्ञाताकडे: विद्यार्थांना माहित असलेल्या गोष्टीकडून माहित नसणाऱ्या गोष्टीकडे नेणे.
उदा-जिल्हा परिषदेचे कार्य शिकवतांना प्रथम ग्रामपंचायत ,तहसील व नंतर जिल्हापरिषद चे कार्य शिकवणे.
३.मुर्ताकडून अमुर्ताकडे: विद्यार्थांच्या प्रत्यक्ष अनुभवातून नंतर त्यांना अप्रत्यक्ष अनुभव देणे.
उदा-विद्यार्थांना पोस्टकार्ड माहिती आहेत यावरून पोस्टाचे व्यवहार शिकवणे.
४.साध्याकडून सामिश्राकडे : प्रथम मुळाक्षरे काना,मात्रा,विलांटी ओळख करून देणे नंतर जोडाक्षर शिकवणे.
५.मानसशास्त्रीय दृष्टीकोनाकडून तर्कशास्त्र दृष्टीकोनाकडे : विद्यार्थांना तर्कशास्त्र दृष्टीकोन निर्माण करतांना ताप आल्यास डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवता ? या अनुभवाची शास्त्रीय मीमांसा करावी.
६.पूर्णा कडून अंशाकडे: विद्यार्थांना संपूर्ण फुल दाखवून नंतर त्या फुलांची रचना कशी आहे हे शिकवणे.
७.विशेषांकडून सामन्याकडे: उदागामी पध्दतीने विद्यार्थांना व्याकरण शिकवावे.
८.सामान्यकडून विशेषाकडे : अवगामी पध्दतीने विद्यार्थांना व्याकरण शिकवावे.
९.पृथक्करणांकडून संयोजानाकडे: भाग सुटे करणे उदा-भूमितीचे प्रमेय शिकवणे.
१०. संयोजानाकडून पृथक्करणांकडे: यात क्रिया विना वाच्यार्थ व्यर्थ आहे .विद्यार्थांना भाषा विषयांच्या म्हणी,वाक्यप्रचार शिकवणे.
११.प्रत्याक्षाकडून प्रतीनिधीत्वाकडे : विद्यार्थांना चित्र दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव देणे.
१२.निसर्गांच्या मार्गांने चला: विद्यार्थांच्या आवडी निवडी ,अनुभव विश्व ,आकलन क्षमता ,बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी निसर्गाच्या अनेक गोष्टीचे अनुकरण करायला लावणे.

९.व्यक्तीमहत्व व शिक्षकांच्या व्यक्तिमहत्वातील आवश्यक गुण :
व्यक्तीमहत्व :मानसिक जीवन व मनाच्या क्रिया प्रतिक्रिया यांचा संघटीत समूह म्हणजे व्यक्तीमहत्व होय.
१.शारीरिक गुण : निरोगी ,चेहरा प्रसन्न .
२.बौद्धिक पात्रता: विषय तत्वे,मुल्ये ,सजावून देणे.
३.मानसिक योग्यता: आपलेपणा,प्रेम,सुरक्षितता.
४.सामाजिक बांधिलकी :समाजाशी मिळून मिसळून राहण्याची पात्रता.
५.चरित्र: शीलवान व चारीत्रावन असावा.
६.व्यावसायिक कौशल्य: आपल्या व्यवसायातील सर्व अध्यापन कौशल्य त्यांच्या जवळ असावे.

१०.शिक्षकांच्या व्यक्तिमहत्वाचा विद्यार्थांच्या व्यक्तिमहत्वावर होणारा परिणाम:
१.शिक्षक निरोगी व प्रसन्न चेहऱ्याचा असेल तर तो विद्यार्थांना योग्य अध्यापन करेल.
२.शिक्षकात विषय,तत्वे,मूल्य समजावून देण्याची पात्रता असेल तर तो विद्यार्थांना अध्ययन विषयात आवड निर्माण करेल.
३.शिक्षकांजवळ अपलेपणा ,प्रेम,सुरक्षितता,स्विकार,स्वतंत्र व्यक्तीमहत्वचा सन्मान मनोरंजन ,मित्रसहवास,असेल तर तो विद्यार्थांचे मानसिक स्वास्थ चांगले ठेवेल.
४.शिक्षक समाजाशी मिळून मिसळून राहत असेल तर विद्यार्थी त्यांचे अनुकरण करून समाज प्रिय वर्तन करतील.
५.शिक्षक शीलवान ,चारीत्रावन असेल,तर तो मुलांना चांगले अनुभव देईल.
६.शिक्षकाजवळ आपल्या व्यवसायातील सर्व कौशल्य असतील तर तो विद्यार्थांसाठी परिणाकारक अध्यापन करून अध्यापन सचेतन बनवेल.
११.गुरु सान्निध्य ही संकल्पना :
गुरु ब्रम्हा ,गुरोर्विष्णू ,गुरुदेवो महेश्वरा!
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरुवेनम:
एका हदयातील विचार दुसऱ्या हदयात पेरणे म्हणजे गुरु सान्निध्य होय.

७.व्यक्तिभेद

१.व्यक्तिभेद :
व्यक्ति व्यक्ति मध्ये असणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या अंतरालाच व्यक्तिभेद म्हणतात.

२.व्यक्तिभेदाचे लक्षणे:
१.शारीरिक : प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगळी .
२.बौद्धिक : प्रत्येकाचा बुद्धांक वेगळा आहे.
३.भावनिक : दयाळू ,उदार,कंजूस,बहिर्मुख असतात.
४.कलाविषयक: कोणाला क्रिकेट,खो-खो ,कबड्डी ,लंगडी खेळ आवडतो.
५.अभिवृत्ती मुल्ये : कोणी सदाप्रसन्न,सदाकुढी असतात.
६.ग्रहण शक्ती : प्रत्येकाची ग्रहण शक्ती सुध्दा वेगळी असते.

३.व्यक्तिभेदाची करणे :
१.लिंगभेद : स्त्रिया भावना प्रधान,पुरुष विचार प्रधान असतो.
२.वय: तरुणाचे शरीर मजबूत तर वृद्धाचे क्षीण होते.
३.शारीरिक गुण दोष :शारीरिक व्यंग्य ,आंधळे,बहिरे-मुके असे दोष.
४.परिस्थिती :खेड्यातील,ग्रामीण व शहरी मुलांतील फरक.
५.अनुवांशिकता : आई –वडिलांचे गुणधर्म मुलांत येतात.
६.ज्ञानेद्रीयांची क्षमता: स्वाद,गंध,स्पर्श अनुभवण्याची क्षमता.
७.व्यक्तिमत्व : कोणी अंतरर्मुख,कोणी बहिर्मुख असतो.
८.अंतस्त्राव ग्रंथी : या ग्रंथीचा स्त्राव सगळ्याच्या शरीरात वेगळा असतो .

४.बुद्धी ही संकल्पना :
१.आल्फ्रेड बीने : बुद्धी ही विचार प्रक्रिया आहे.
१.विशिष्ट दिशा देण्याची व टिकवण्याची वृत्ती .
२.आपले ध्येय साध्यते साठी समायोजन शक्ती .
३.आत्मपरीक्षण शक्ती .

२.वूड्रो : नवीन ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती म्हणजे बुद्धी .
३.वर्टा: बुद्धी म्हणजे जन्मजात सर्वकष मानसिक योग्यता.
बुद्धीची घटक सिद्धांत.
१.टर्मन : ज्या व्यक्तिची अमूर्त पातळी विचार करण्याची शक्ती जितकी अधिक तितकी ती व्यक्ति बुद्धिमान असते.
२.स्पिअरमन : व्यक्तित सामान्य घटक व विशेष घटक असतो.ज्या व्यक्तित विशेष घटक असतो ती व्यक्ति बुद्धिमान होय.
३.थोर्नडाईक : अर्मुत चिंतन ,यांत्रिक क्षमता.सामाजिक दृष्टी म्हणजे बुद्धी .
४.थस्टर्न :संख्यीकिक क्षमता,भाषिक क्षमता,शाब्दिक ओघाता,स्मुर्ती,तर्कशक्ती ,अवबोध क्षमता,अवकाश क्षमता म्हणजे बुद्धी होय.
५.गिलफोर्ड : १२० घटक सिद्धांत ४ गुणिले ५ गुणिले ६ आठवणे ,ओळखणे ,नवनिर्मिती करणे ,मूल्यमापन करणे.

५.बुद्धिमत्तेच्या विकासावर परिणाम करणारे घटक:
१.अनुवंश व परिस्थिती : मुलांमध्ये अनुवंशिकते कडून येणारे गुणधर्म .
२.लिंग भेद: स्त्रियांची व पुरुषाची बुद्धिमत्ता वेगळी आहे.
३.वंशभेद : पिड्यान-पिड्यातून मुलांत अनेक गुणधर्म येतात व त्याचा परिणाम बुद्धिमत्तेवर होतो.
४.शालेय दर्जा : बुद्धीमत्तेच्या विकासास संधी मिळते.
५.सास्कृतिक दर्जा : बुद्धिमत्तेचा विकास निश्चित होणे.
६.आर्थिक व सामाजिक दर्जा: चांगला असेल तर बुध्दिमत्तेचा विकास चांगला होईल.
७.बालसंगोपन : बालकांचे योग्य संगोपन झाले तर बुद्धिमत्तेचा विकास होईल .

६.बुद्धिमापन कसोट्याचे प्रकार :(जनक आल्फ्रेड बीने व सायमन )
१.वैक्तिक : शाब्दिक ,कृती ,मिश्र .
२.सामुहिक : शाब्दिक,कृती,मिश्र .
१.शाब्दिक: भाषा बोलण्यासाठी.
२.कृती : मुक्या –बहिऱ्यासाठी (डॉ.भाटीया )
३.मिश्र: शाब्दिक व कृती या दोन्ही मिळून तयार होते.
उदा-पेपर पेन्सिल कसोटी : ही प्रतिमा आरशात कशी दिसेल.आकृती काढणे.

८.मानसिक वय संकल्पना : (जनक आल्फ्रेड बीने)
१.मानसिक वयामुळे बौद्धिक विकासाची अधिक कल्पना येते.
२.व्यक्ति व्यक्तिमधील भिन्नता स्पष्ट करण्यासाठी मानसिक वय आवश्यक आहे.

९.बुध्दिमत्ते नुसार मुलांचे वर्गीकरण :(प्रमाण वर्ग व बुद्धांक )
१.निर्बुद्ध : ० ते २४
२.जड बुद्धीमत्ता: २५ ते ४९
३.मंदबुद्धीमत्ता: ५० ते ७९
४.अल्पबुद्धीमत्ता: ७० ते ७९
५.आप सामान्य बुद्धिमत्ता: ८० ते ८९
६.साधारण बुद्धीमत्ता: ९० ते १०९
७.शीघ्र बुद्धिमत्ता: ११० ते ११९
८.कुशाग्र बुद्धिमत्ता: १२० ते १३९
९.अलौकिक बुद्धिमत्ता: १४० ते १४९
१०.प्रतिभासंपन्न : १५० व त्यापेक्षा जास्त बुद्धांक .

९.बुद्धांकांचे सूत्र:
बुद्धांक = मानसिक वय / जन्म वय * १००
उदा :-वनिताचे मानसिक वय १० वर्षे व जन्मवय ८ वर्षे आहे तर तिचा बुद्धांक काढा?
मानसिक वय= १० वर्षे .
जन्म वय = ८ वर्षे .
बुद्धांक = मानसिक / जन्म वय * १००
बुद्धांक = १०/८ * १००
बुद्धांक =१२५ .
म्हणजे वनिता ही कुशाग्र बुध्दिमत्तेची मुलगी आहे.

उदा –सुनिलचा बुद्धांक १२० आहे.जन्म वय १० वर्षे आहे.तर तिचे मानसिक वय किती ?
बुद्धांक =१२०
मानसिक =?
जन्म वय = १० वर्षे .
बुद्धांक =मानसिक वय /जन्म वय * १००
१२० = मानसिक वय / १० * १००
मानसिक वय = १२०० /१००
मानसिक वय = १२ वर्षे .

१०.शिक्षकांने व्यक्तिभेद लक्षात घेऊन अध्यापन करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.अभ्यासक्रम : बुध्दिमत्ते नुसार मुलांची स्वतंत्र शाळा किंवा स्वतंत्र तुकडी असावी व अलौकिक बुध्दिमत्ते च्या विद्यार्थात अहंगड व मंदबुद्धीच्या मुलांत न्यूनगंड निर्माण होऊ नये.
२.व्यक्तिगत मार्गदर्शन : विद्यार्थांचे वय,आवडी निवडी,अनुभव विश्व ,आकलन क्षमता,बौद्धिक स्तर लक्षात घेऊन शिक्षकांने अध्यापन करावे व मनोविकृती व अपंग मुलांसाठी तज्ञांचा सल्ला घेणे.
३.मुलांच्या बुध्दिमत्तेसाठी अवांतर उपक्रम :
१.बालगीते,समूहगीते, बडबडगीते,बालनाट्य.
२.सहली.
३.ज्ञानेद्रीयांना अनुभूती देणारे व्यवसाय.
४.तोंडी भाषेचे खेळ.
५.बौद्धिक स्पर्धा.
६.वत्कृत्व स्पर्धा .
४.सपंन्न अभ्यासक्रम :विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा देणे म्हणजे संपन्न अभ्यासक्रम होय.प्रज्ञावान व वैशिष्टपूर्ण बालकासाठी संपन्न अभ्यासक्रम असावा.

११.पर्यवेक्षित अभ्यासक्रम ( प्रो.हॉलक्वेस्ट )
पर्यवेक्षित अभ्यासक्रम: पाहणे,लक्ष देणे,चुकले तिथे मार्गदर्शन करणे म्हणजे पर्यवेक्षित अभ्यासक्रम होय.
१.कोणत्या घटकांच्या अभ्यासक्रमासाठी पर्यवेक्षण तंत्र वापरायचे हे निश्चित करणे.
२.वेळापत्रकाप्रमाणे त्या तासिकांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
३.विद्यार्थांच्या चूका दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांने मार्गदर्शन करणे.
४.विद्यार्थांच्या चूका सुधारणा झाली किंवा नाही यांची पाहणी करणे.

पर्येक्षित अभ्यासक्रमाचे फायदे:
१.शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा फायदा .
२.विद्यार्थांना स्वत:च्या गतीने अभ्यासक्रम पूर्ण करतात.
३.शिक्षकाला विद्यार्थांच्या शंका व अडचणी कळतात.
४.विद्यार्थांना व्यक्तिगत मार्गदर्शनाची गरज नाही .
५.विद्यार्थांना वाचनाची सवय लागते.
६.विद्यार्थी स्वत:आपल्या समस्या सोडवितात .

www.adarshshala.blogspot.in गो टू टॉप